Russian Tourist number decreased in Goa
Russian Tourist number decreased in Goa  Dainik Gomantak
गोवा

Russian Tourist in Goa: पुतिनच्या एका निर्णयामुळे गोव्याचं नुकसान? पर्यटकांच्या आकडेवारीतून उघड झालं वास्तव

Kavya Powar

Goa Tourism News:

डिसेंबर महिना उजाडला की भारतासह जगभरातील पर्यटकांची पावले गोव्याकडे वळतात. गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये रशियन नागरिकांचं प्रमाण सर्वाधिक असते. मात्र, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या रशियन नागरिकांच्या परदेश प्रवासावर निर्बंध लादल्याने गोव्यातील रशियन नागरिकांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसते.

रशियन नागरिक सुट्टीसाठी भारतात येणे पसंत करत असून, गोवा हे त्यांचे आवडत्या स्थळांपैकी एक असल्याचे ते सांगतात. शिवाय ते इथे आल्यावर मनसोक्त पैसा खर्च करत असल्याने पर्यटन महसूल वाढण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे रशियन नागरिकांची संख्या घटल्यावर त्याचा इथल्या पर्यटनावर परिणाम होतो.

उपलब्ध माहितीनुसार, 2017 मध्ये गोव्यातील 8.9 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक आगमनांपैकी 58 टक्के म्हणजेच 4.9 लाख रशियन पर्यटक होते. मात्र गेल्या वर्षी राज्यात आलेल्या 1.69 लाख परदेशी नागरिकांपैकी 7.41 टक्के म्हणजे केवळ 12,626 पर्यटक हे रशियाचे होते.

त्यात सध्या रशियन सरकारने काही कालावधीसाठी नागरिकांच्या विदेश दौऱ्यावर बंदी घातल्याने पर्यटकांच्या संख्येत अधिकच घट होणार असल्याचे चित्र आहे.

कोविड काळानंतर गोव्यात विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम झाला आहे. तसेच ई-विझामुळे ब्रिटनमधून येणाऱ्या पर्यटकांना त्रासदायी ठरले आहे. आता इस्रायली-पॅलेस्टाईन युद्धामुळे देखील परिणाम झाला आहे.
नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

...यामुळे रशियन नागरिकांच्या विदेशी प्रवासावर बंदी!

रशियामध्ये कालपासून (11 डिसेंबर) नवीन नियम लागू झाले आहेत. यामध्ये ज्या नागरिकांना देश सोडण्यास मनाई आहे, त्यांना त्यांचे परदेशी पासपोर्ट जमा करणे बंधनकारक आहे.

स्वोबोदा (svoboda) या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकृतपणे लष्करी सेवेत बोलावलेल्या लोकांसह रशियन नागरिकांना परदेशात प्रवास करण्यास प्रतिबंधित करणारा नियम लागू झाला आहे. लष्करी सेवा पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्यांची कागदपत्रे आणि परदेशी पासपोर्ट परत करण्यात येणार आहेत.

मात्र यामुळे गोव्यात येणारी पर्यटक संख्या घटणार असून त्याचा परिणाम महसूलावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT