Russian Tourist Booked Dainik Gomantak
गोवा

Russian Man Arrested: रशियामधून आलेल्या इसमाला ठोकल्या पोलिसांनी बेड्या; वैध कागदपत्रांशिवाय करत होता वास्तव्य

Russian Tourist in Goa: अनेक दिवसांपासून हा पर्यटक गोव्यात वैध कागदपत्रांशिवाय राहत होता, पोलिसांना त्याचा पत्ता समजला असल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

Akshata Chhatre

म्हापसा: पर्यटन हा गोव्यातील प्रमुख व्यवसाय आहे, या पर्यटनाच्या निमित्ताने अनेक देशी तसेच विदेशी पर्यटक गोव्याच्या दिशेने येत असतात. पर्यटकांचे गोवा कायम स्वागत करत असला तरीही काहीवेळा हेच पर्यटक राज्यासाठी डोकेदुखी बनू शकतात. अलीकडेच रशियामधून आलेल्या एक पर्यटकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पर्यटक गोव्यात वैध कागदपत्रांशिवाय राहत होता, पोलिसांना त्याचा पत्ता समजला असल्याने आता त्याला अटक करण्यात आली आहे.

हा पर्यटक वैध कागदपत्रांशिवाय गोव्यात राहत असल्याने त्याने विदेशी कायद्याचे उल्लंघन केले असून त्याला अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एएनसी पीएसआय मंजुनाथ नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही घटना उघडकीस आली.

९ डिसेंबर रोजी २६ वर्षीय डॅनिल किटुआकोव्ह नावाच्या एका रशियन पर्यटकाला वैध कागदपत्र नसल्याच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. आरोपीच्या नावे फॉरेनर्स ऑर्डर १९४८ च्या कलम ७(१) आणि कलम ७(३) (iii) आणि फॉरेनर्स ऍक्ट, १९४६ च्या कलम १४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणाची पुढील तपासणी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT