Goa police  Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: पुडी द्यायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, एक कोटींच्या ड्रग्जसह रशियन नागरिकाला अटक

Manish Jadhav

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. चोपडे बस स्टॉपजवळ छापा टाकून ईउर्ली विचाली कोरीतीन (वय वर्ष 41) या रशियन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून तब्बल 1.03 कोटी रुपयांचा 2 किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडे सर्कलजवळ मोजरीच्या दिशेने जाणाऱ्या बस स्टॉप परिसरात ड्रग्ज तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गोवा पोलिसांच्या अमली विरोधी पथकाने कारवाई केली.

दरम्यान, ड्रग्ज तस्करीची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजिंत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली पथक मंगळवार रात्री 11.12 वाजता रवाना झाले.

गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सजिंत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वरील दोन्ही ठिकाणी बुधवारी सापळा रचला होता. याचदरम्यान, पथकाला त्या ठिकाणी एक परदेशी नागरिक संशयास्पदरित्या फिरत असल्याचा दिसला. त्यानंतर त्यांनी त्याची तात्काळ चौकशी केली. पथकाला त्याने त्याचे नाव ईउर्ली विटाली कोरीतीन असे सांगितले. तो शिवोली परिसरात राहत असल्याचेही सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन प्लास्टिकच्या बॅग मिळाल्या.

कोरीतीनच्या पहिल्या बॅगेत 1.7 किलोचा उच्च दर्जाचा गांजा तर दुसऱ्या बॅगेतून 300 ग्रॅम उच्च दर्जाचा गांजा मिळाला. दोन्ही बॅगमधील ड्रग्जची किमत तब्बल 1.03 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. त्यानंतर पथकाने या रशियन नागरिकाला अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम 20(बी) (ii)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. त्याला पेडणे येथील न्यायालयात दाखल केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fatal Accident at Mandrem: मांद्रे येथे भीषण अपघातात २ मुलींनी गमावला जीव; ट्र्कचालक पोलिसांच्या ताब्यात

Goa Crime: फ्लॅट देण्याचे आश्वासन, होंडा सत्तरीत महिलेची 26 लाखांची फसवणूक

Robbery at Mapusa: SBI कर्मचारी म्हणत घातला 2.36 लाखांचा गंडा, अज्ञाताचा शोध सुरू..

Goa Eco Sensitive Zone: आम्ही करायचे काय..? म्हाऊस ग्रामसभेत अतिसंवेदनशील क्षेत्राला विरोध

'Heritage Master Plan तयार करा अन्यथा..'; जुने गोवे वाचवण्यासाठी सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन समितीचा पुढाकार

SCROLL FOR NEXT