Vishwajit Rane and Divya Rane. Dainik Gomantak
गोवा

'होंड्यात ग्रामीण आरोग्य प्रकल्प मार्गी लावणार'

विश्वजित राणे: प्रलंबित कामे पाच वर्षांत पूर्ण करण्याची ग्वाही

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: होंडा हे सत्तरी तालुक्याचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या पंचायतक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देऊन येणाऱ्या काळात येथे प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लावली जातील. होंडा भागात औद्योगिक क्षेत्र वाढल्यामुळे भागाला शहरीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून होंडा परिसराचे सुशोभीकरण, मैदान उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण आरोग्य केंद्राचा प्रकल्प लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही आरोग्यमंत्री विश्वजित राणे दिली.

होंडा पंचायत क्षेत्रातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ दिव्या राणे, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, होंडा पंचायतीचे सरपंच आत्मा गावकर, पंच शिवदास माडकर, सया पावणे, पांडुरंग गावकर, विक्रांत देसाई, प्रतिक्षा गावडे, सत्तरी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत, आदिवासी मोर्चा अध्यक्ष आनंद गावडे, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, गोवा धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष बी. डी. मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, होंडा पंचायत क्षेत्रातील जनतेने आपण सांगितल्याप्रमाणे पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांना भरघोस मतांची आघाडी दिली आहे. त्यामुळे सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. होंडा पंचायत क्षेत्रांच्या विकासाचा आराखडा तयार केला असून, होंडा परिसरात सर्व विकासकामांना लवकरच सुरवात होईल.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, विनोद शिंदे, बी. डी. मोटे, आनंद गावडे, शिवदास माडकर, नकुळ गावकर यांचीही समयोचित भाषणे झाली.

होंडा नागरिकांच्यावतीने विश्वजित राणे व डॉ. दिव्या राणे यांना समई भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झालेल्या तुळशी नावेलकर यांना एक मिनिट शांतता राखून श्रद्धांजली वाहण्यात आली. महेश गावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महादेव गावकर यांनी सूत्रसंचालन केले. अनंत धुमे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT