Rupal Gosavi  Dainik Gomantak
गोवा

Russia Ukraine War:...म्हणून गोव्यातील रुपल गोसावीला युक्रेनला परतायचे आहे

रूपल दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेली होती.

दैनिक गोमन्तक

मये: युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या गोव्यातील सहा विद्यार्थ्यांपैकी मये येथील रुपल गोसावीला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी लवकरच युक्रेनला परतायचे आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे तिला आपले शिक्षण अर्धवट सोडून युक्रेनमधून पळ काढावा लागला. रूपल दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेली होती.

युद्ध लवकर संपेल आणि सर्व काही सुरळीत होईल, अशी आशा रुपलने व्यक्त केली आहे. युक्रेनच्या (Ukraine) टेर्नोपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी (Student) असलेल्या रुपलने तिला मायदेशी परतण्यासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचे आभार मानले.

रुपल म्हणाली, “युद्धभूमीवरून सुरक्षितपणे घरी पोहोचल्याने मला दिलासा मिळाला आहे. मी आशा करते की युक्रेनमध्ये अडकलेले सर्व भारतीयांना लवकर मदत मिळेल."

रुपलची आई रश्मी यांनी देखील सरकारचे आभार मानले. त्या म्हणाल्या, "आम्ही खूप काळजीत होतो. रुपलच्या परतण्याकडे डोळे लाऊन बसलो होतो. सरकारने योग्य पावले उचलल्याने आज आमची मुलगी सुखरूप घरी पोहचली आहे. यासाठी मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्य आणि केंद्र सरकारची आभारी आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: हा नवरा आहे की सैतान? पत्नीची बोटं कापली, शीर धडावेगळं करुन फ्रिजमध्ये ठेवलं, मृतदेह खोलीतच सडत ठेवला; 25 वर्षीय 'रिया'ची निर्घृण हत्या

Dwidwadash Yog 2026: ग्रहांचा राजा अन् देवांचे गुरु एकत्र! 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; द्विद्वादश दृष्टी योगाचा मोठा चमत्कार

U20 Asian Cup 2027: दोन दशकांचा दुष्काळ अखेर संपला! 20 वर्षांच्या वनवासानंतर टीम इंडियाची 'एएफसी आशिया कप'मध्ये दिमाखदार एन्ट्री

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

SCROLL FOR NEXT