Rumdamol Panchayat Dainik Gomantak
गोवा

Rumdamol Panchayat : ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर रुमडामळ पंचायत क्षेत्रातील संवेदनशील जागांवर पोलिसांची तुकडी तैनात

आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासन येथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज

गोमन्तक डिजिटल टीम

Rumdamol Panchayat : रुमडामळ-दवर्ली पंचायत क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. आगामी ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर रुमडामळ पंचायत क्षेत्रातील चार संवेदनशील जागांवर सुमारे १५ आरआयबी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

सध्या या भागात पोलिसांची गस्त सुरूच आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासन येथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज झाले आहे. रुमडामळ येथील पंच सदस्य विनायक वळवईकर यांच्यावर चाकूहल्ला झाल्यापासून या ठिकाणचे वातावरण तंग बनले आहे.

या परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यानंतर रविवारी सायंकाळी बीफचे दुकान खुले करण्याबाबत विचारणा केल्यानंतर मुस्लिम समुदाय रुमडामळ येथील आऊट पोस्टवर जमा झाला होता. पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी समजूत काढून सर्वांना माघारी पाठवले होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवल्यास पोलिसांकडून जादा कुमकही तैनात करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT