Rumdamol Panchayat Dainik Gomantak
गोवा

Rumdamol Dovorlim: निवडणूक अधिकाऱ्याच्‍या छातीत कळ, रुमडामळची निवडणूक रद्द; रडीचा डाव असल्याचा सत्ताधारी गटाचा आरोप

Rumdamol Dovorlim Election: रुमडामळचे सरपंच, उपसरपंच निवडण्‍यासाठी बोलावलेली बैठक या बैठकीसाठी नियुक्‍त निवडणूक अधिकारी छातीत कळ आल्‍यामुळे इस्‍पितळात दाखल झाल्‍यामुळे ही बैठक आणि निवडणूक रद्द करण्‍यात आली.

Sameer Panditrao

मडगाव: रुमडामळ-दवर्ली पंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच निवडण्‍यासाठी आज बोलावलेली बैठक या बैठकीसाठी नियुक्‍त निवडणूक अधिकारी छातीत कळ आल्‍यामुळे इस्‍पितळात दाखल झाल्‍यामुळे ही बैठक आणि निवडणूक रद्द करण्‍यात आली.

दरम्‍यान, ही पंचायत भाजपच्‍या हाती देण्‍यासाठीच हा रडीचा डाव असल्‍याचा दावा सत्ताधारी गटाने केला असून आमचाच उमेदवार निवडून येणार हे कळल्‍यामुळेच हे आजाराचे नाटक करून ही निवडणूक रद्द केल्‍याचा आराेप केला.

रुमडामळच्‍या सरपंच मुबिना फणीबंद व उपसरपंच मुश्‍‍ताफा दोडामणी यांनी पदाचा राजीनामा दिल्‍याने सरपंच निवडीसाठी आज बैठक बाेलावली होती. दरम्‍यान बीडीओने सत्ताधारी चार पंचांना अपात्र करण्‍याच्‍या आदेशाला अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाकडून स्‍थगिती मिळाली होती.

निवडणूक तारीख आठवड्यात जाहीर करा!

या पंचायतीत ९ सदस्‍य असून त्‍यातील चार सदस्‍य भाजपचे असून पाच सदस्‍य बिगर भाजप गटाचे आहेत. हे लाेकशाहीचा गळा घोटण्‍याचे कारस्‍थान असा आरोप सत्ताधारी गटातील उमर पठाण यांनी केला. आमच्‍या गटातील चार सदस्‍यांना अपात्र केल्‍यानंतर दुसऱ्या दिवशीच ज्‍या त्‍वरेने ही निवडणूक जाहीर केली होती.

तीच त्‍वरा दाखवत निवडणुकीची पुढील तारीख एका आठवड्यात जाहीर करावी, अशी मागणी त्‍यांनी केली. या पंचांच्‍या अपात्रतेला २० दिवसांची स्‍थगिती मिळालेली आहे. सध्‍या जे काय चालू आहे ते पाहिल्‍यास ही स्‍थगितीची मुदत उठल्‍यावरच ही निवडणूक घेणार असे वाटते, अशी शंका त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लंडनचा फिल्ममेकर गोव्यात येतो! मराठी चित्रपट महोत्सवात पर्वणी; सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांचे नवेकोरे सिनेमे पाहता येणार..

Goa Assembly Live: "मोपा विमानतळावरील ९ दुकाने स्थानिक चालवत नाहीत" युरी

Bicholim: डिचोली शहराला कचऱ्याचे ‘ग्रहण’! बाजारात दुर्गंधी, जनावरांचा वाढला उपद्रव

Aldona: 'फुटसाल मैदानाची जागा बदला'! हळदोणे ग्रामस्थांची मागणी; फेरेरांनी केले पर्यायी जागा सुचवण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT