Goa Latest Crime News Canva
गोवा

Rumdamol Davorlim: दवर्लीच्या पंचांना युवकांच्या गटाकडून मारहाण! हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा

Rumdamol-Davorlim Panch Attack: रुमडामळ-दवर्लीचे पंच विनायक वळवईकर यांच्यावर शुक्रवारी रात्री युवकांच्या एका गटाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वळवईकर यांच्या नाकाला आणि डोक्याला इजा झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Rumdamol-Davorlim Panch Attack

सासष्टी: रुमडामळ-दवर्लीचे पंच विनायक वळवईकर यांच्यावर शुक्रवारी रात्री युवकांच्या एका गटाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वळवईकर यांच्या नाकाला आणि डोक्याला इजा झाली आहे.

पंच वळवईकर यांनी मडगाव पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली असून पोलिस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यासंदर्भात वळवईकर यांनी सांगितले की, माझ्या खाद्यपदार्थाच्या गाड्यावर प्रथम दोन-तीन युवकांनी माझ्याशी बाचाबाची केली.

त्यानंतर त्यांच्या मागोमाग आणखी सात-आठ युवकांनी तिथे येऊन मला धक्काबुक्की केली. माझ्या डोक्यावर बाटली मारून नाकावर मूठही मारली. याउलट रोहित पेंडेरकर यांनी विनायक वळवईकर आणि इतर सहाजणांवर तक्रार नोंद केली आहे.

हल्ला पूर्वनियोजित

या हल्ल्यामागे नेमके कोण आहे, आणि काय हेतू होता ते समजले नाही, असे वळवईकर यांनी सांगितले. ज्या युवकांनी माझ्यावर हल्ला केला, त्यातील काहीजणांना मी ओळखतो. मात्र, त्यावेळी नेमके कोण कोण होते हे निश्र्चितपणे सांगता येत नाही. त्यांनी माझ्यावर कुठला राग काढला हेसुद्धा माझ्या लक्षात येत नाही. मात्र, हा हल्ला पूर्वनियोजित होता असे मला वाटते, असेही वळवईकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 151 जयंती अगोदर गोव्यात बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला जावा

Uma Patil Case: पैसे मागितल्यास 'उमा' द्यायची धमकी! दहा वर्षांत जमवली लाखोंची माया; वास्कोप्रकरणी 'दीक्षा'विरुद्धही नोटीस जारी

''...राजकीय सहभागाशिवाय हे शक्यच नाही'', Cash For Job Scam वर लक्ष्मीकांत पार्सेकरांची रोखठोक प्रतिक्रिया

National Press Day: गोमंतकचे संपादक दिग्दर्शक राजू नायक यांना सर्वोत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार!

Goa History: छत्रपती व पोर्तुगिजांमध्ये तहनामा

SCROLL FOR NEXT