Viral Post On Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: कॅसिनोत मारवाडी, महागड्या रुम्स आणि उद्धट चालक; निवृत्त लष्कर अधिकाऱ्याने गोवा पर्यटनाबाबत मांडले मत

Viral Post On Goa Tourism: एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने गोव्यात पर्यटनाबाबत आलेला अनुभव 'एक्स' या सोशल मिडियावरुन शेअर केला आहे.

Pramod Yadav

पणजी: गेल्या काही महिन्यांपासून गोव्यातील पर्यटन घटल्याचा दावा सोशल मिडियावरुन अनेकजण करतायेत. घटत्या पर्यटनाचे खापर राज्यातील वाहतूक व्यवस्था, महागडे हॉटेल्स, खाद्यपदार्थ, वाढते गुन्हे यावर फोडण्यात आले. राज्य सरकारने मात्र पर्यटन घटल्याचा दावा खोडून काढला असला तरी सोशल मिडियावर गोवा पर्यटनाबाबत नकारात्मक सूर अद्याप सुरु असल्याचे दिसत आहे.

सोशल मिडियावरुन गोव्यातील पर्यटन दर्जा खलावला असल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. यातच रि ओढत अनेकांनी त्यांना देखील गोव्यात असमाधानकारक अनुभव आल्याचे म्हटले. यात आता देशाची सेवा केलेल्या एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने गोव्यात पर्यटनाबाबत आलेला अनुभव 'एक्स' या सोशल मिडियावरुन शेअर केला आहे. अधिकाऱ्याने गोव्याबाबत मांडलेले मत देखील नकारात्मक आहे.

मेजर जनरल राजू चौहान असे या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. गोवा पर्यटनाचे प्रामाणिक विश्लेषण असे म्हणत चौहान यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी

- उद्धट चालक

- निकृष्ट जेवण आणि सेवा

- महागड्या रुम्स

- क्रूझमध्ये पैशाला किंमत नाही

- कॅसिनोत फक्त मारवाडी

अशी लिस्ट चव्हाण यांनी शेअर केली आहे. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर कमी गर्दी असल्यामुळे ते अप्रतिम आहेत असे मत चौहान यांनी व्यक्त केले आहे.

चौहान यांच्या एक्सवरील पोस्टवर काही जणांनी मत व्यक्त केले आहे. यावर एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने देखील मत मांडले आहे. "गोवा सरकारने पर्यटनाबाबत व्यवस्थित जनजागृती करण्याची गरज आहे. राज्यासाठी पर्यटन हा महसूल मिळवण्याचे मुख्य साधन आहे", असे मत निवृत्त आयपीएस ढिल्लन यांनी व्यक्त केले आहे.

याशिवाय आणखी एक युझरने त्याला देखील गोव्यात वाईट अनुभव आल्याचे सांगितले. पण, गोव्यातील समुद्रकिनारे आवडल्याचे या युझरने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT