Rude behavior of the headmistress; Teacher's complaint to police Dainik Gomantak
गोवा

Goa: मुख्याध्यापिका करतेय असभ्य वर्तन; शिक्षकाची पोलिसात तक्रार

भुईपाल सरकारी माध्यमिक विद्यालयातील प्रकार, शिक्षक व मुख्याध्यापिका वाद चव्हाट्यावर

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या भुईपाल सत्तरी येथिल सरकारी माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाने विद्यालयाच्या मुख्याध्यापिके विरोधात होंडा पोलिस चौकी मध्ये तक्रार केली असल्याची माहिती मिळाली आहे. सदर प्रकरणाची दखल घेऊन उद्या दि 7 रोजी चौकशी साठी त्याना वाळपई पोलिस स्थानकात बोलवण्यात आले आहे. (Rude behavior of the headmistress; Teacher's complaint to Goa police)

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार समजले की या विद्यालयाचे शिक्षक महेश नाईक यांनी सदर तक्रार दाखल केली असून, मुख्याध्यापिकेचे मानसिक संतुलन बिघडल्याने, ती आपल्याशी असभ्य वर्तणूक करीत आहे, अशा प्रकारचे आरोप केले आहे.

गेल्या तीन चार वर्षांपासून या विद्यालयाचा निकाल शिक्षक व मुख्याध्यापिका यांच्या सहकार्याने समाधानकारक लागत आहे, यामुळे येथे विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती, परंतू काही दिवसांपासून येथिल शिक्षक व मुख्याध्यापिका यांच्या मधील संबंध बिघडले असल्याने आणि त्याचाच परिणाम म्हणून आज एका शिक्षकाने शिक्षण खात्याकडे तक्रार करून काहीच फायदा होत नसल्याने शेवटी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे.

दरम्यान या विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोझी मिनेजिस यांच्या विरोधात दि 19 मार्च 2021 रोजी मुख्याध्यापिका कडून होणारी सतावणूक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक करीत असल्याचे नमूद करून लेखी तक्रार उत्तर गोवा शिक्षण विभागाचे उपसंचालका कडे केली होती, परंतू सदर तक्रारीची कोणतीच दखल त्यावेळी शिक्षण खात्याने घेतली नसल्याने, या विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापिका मध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, आता पोलिस ठाण्या पर्यंत पोहोचला आहे. या संबंधी तक्रारदार शिक्षक यांच्याशी संपर्क साधून विचारले असता त्यांनी तक्रार केली असल्याचे कबूल केले असून, या संबंधी आपल्याला न्याय मिळणार याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT