RTI activist Narayan Naik case Dainik Gomantak
गोवा

RTI activist Narayan Naik case: मोबाईल ठरला तपासकामातील दुवा

सामाजिक तथा आरटीआय (RTI) कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी रामगोपाल यादव उर्फ करिया याला ताब्यात घेऊन अटक केली.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक (Narayan Naik) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी रामगोपाल यादव उर्फ करिया याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यामुळे हा हल्ला कुणी केला, याचा शोध लवकरच लागण्याची शक्यता आहे. करिया (40) हा झरीत-सांकवाळ येथे राहतो. वेर्णा पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. हल्ला झाल्यानंतर करिया हा नारायण नाईक यांच्या मदतीला धावून आला होता. मात्र, पोलिसांना संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे (crime branch) सुपूर्द करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीआय विश्वेश कार्पे व पीआय लक्ष्मी आमोणकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.(RTI activist Narayan Naik attack Case handed over to crime branch)

सामाजिकी कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर शनिवारी अज्ञातांनी लोखंडी सळईने हल्ला केला होता. यामध्ये नाईक हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखले केले होते. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तपास करून करिया याला अटक केली. आता अधिक चौकशीतून त्या दोन हल्लेखोरांना अटक करणे सोपे होणार आहे.

दोघा अज्ञात हल्लेखोरांनी सांकवाळ पंचायतीच्या आवारात नाईक यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला केला होता. या हल्ल्यात नाईक यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून डोक्यावर मागच्या बाजूने प्रहार केल्याने मोठी जखम झाली आहे. हल्लेखोर त्यांना ठार मारण्याच्या तयारीत आले होते. मात्र, विशाल नाईक हा युवक मदतीला धावल्याने त्यांचे प्राण वाचले. नाईक यांच्यावर रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली.

नाईक यांना मदतीचा आरोपीचा बनाव

नाईक यांच्यावर हल्ला करणारे ते दोघे कोण, याची माहिती मिळाली असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. विशेष म्हणजे, आरोपी करिया याने या घटनेनंतर जखमी नाईक यांना हल्ल्यानंतर गोमेकॉत नेण्यासाठी काळजीपूर्वक उचलून गाडीत ठेवले आणि रुग्णालयात दाखल केले. बचावकार्य करण्याचा नाटक रचून ‘तो मी नव्हेच’ असे तो दाखवत होता. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलमुळे त्याचे पितळ उघडे पडले.

मोबाईल ठरला तपासकामातील दुवा

शनिवारी दुपारी सांकवाळ पंचायतीबाहेर मुखवटा घातलेल्या तसेच रेनकोट घातलेल्या दोघा अज्ञातांनी नाईक यांच्यावर लोखंडी सळीने हल्ला करून पलायन केले. या घटनेचा तपास करण्यासाठी वेर्णा, वास्को, वास्को रेल्वे पोलीस आणि दाबोळी पोलीस स्थानकातील पोलिसांचे पथक स्थापना केले. तपासावेळी घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल सापडला, जो नाईक यांच्यावर हल्ला करणाऱ्यापैकी एका व्यक्तीचा होता. त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. हा फोन एका गुन्हेगाराचा असल्याचे पोलिसांना समजले. त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी पाहता तो यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्येही सामील होता. नाईक यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली गेली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि यादव याला रविवारी सकाळी कलम 120 (ब) अन्वये गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी आणि नाईक यांच्यावरील हल्ल्यात सहभाग असल्याबद्दल अटक केली.

पंचायत कार्यालयाचे कॅमेरे नादुरुस्त

नारायण नाईक यांच्यावर झालेल्या हल्ल्यात पंचायत सदस्यांचाही हात असू शकतो, अशी शक्यता नारायण नाईक यांचे भाऊ तुळशीदास नाईक यांनी व्यक्त केली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. कारण गेल्या चार वर्षापासून पंचायत कार्यालय व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त आहेत. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: पारोडातील मुळे गावात बेकायदा डोंगरकापणी

Goa Tourism: चर्च, बीचेस हाऊसफुल! गोव्याकडे देशी पर्यटकांचा ओघ; पणजीच्या रस्त्यांवर गर्दी

Dovorlim: सरपंच निवडले, 4 तासांत अविश्वास ठराव; दवर्ली पंचायतीत सत्तानाट्य; विरोधकांचा भाजपला दणका

Goa News: विजय राणे सरदेसाई यांची पुन्हा डिचोली ठाण्यात नेमणूक, कथित आरोप खोटा असल्याचे स्पष्ट

Mulgao: 'गावचे प्रमुख प्रश्न सोडवा, अन्यथा आम्हाला खाण व्यवसाय नकोच'! मुळगाववासीय ठाम; रात्रपाळीला विरोध

SCROLL FOR NEXT