RTI Day 2024 Goa Dainik Gomantak
गोवा

RTI Day 2024: आता कोंकणी भाषेतही; राज्य माहिती आयुक्त आत्माराम बर्वेंची घोषणा

RTI ACT News: राज्यात लवकरच RTI ACT कोंकणी भाषेत प्रसारित होणार असल्याची घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

RTI ACT in Konkani Language

दरवर्षी 12 ऑक्टोबरला RTI ( Right To Information) दिवस साजरा केला जातो. यंदा 12 ऑक्टोबरला दसरा असल्याने पूर्वसंध्येलाच 11 ऑक्टबर रोजी हा दिवस साजरा केला गेला. माहिती आणि प्रसिद्धी विभाग गोवा सरकार आणि गोवा राज्य माहिती आयोगाच्या संयुक्तविद्यमाने आज ( दि. 11 ऑक्टोबर) रोजी RTI दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले असून उपस्थितांना संबोधित करताना राज्यात लवकरच RTI ACT कोंकणी भाषेत प्रसारित होणार असल्याची महत्वाची घोषणा राज्य माहिती आयुक्त आत्माराम बर्वे यांनी केली.

RTI कायद्याच्या कलम 26 नुसार प्रत्येक राज्याने त्यांच्या प्रादेशिक भाषेत RTI कायदा प्रसारित करणे गरजेचे असल्याने गोव्यातही लवकरच RTI कायदा कोंकणी भाषेत सुरु केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

2005 साली RTI कायदा लागू झाल्यानंतर आजपर्यंत गोव्यात कोंकणीमध्ये ह्या कायद्याचे रूपांतरण झाले नव्हते. आता आम्ही त्याचे कार्य सुरू केलेले असून लवकरच गोव्याची राजभाषा कोंकणी मध्ये देखील RTI लोकांसाठी उपलब्ध होईल अशी माहिती आत्माराम बर्वे यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रत्येक खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. राज्याचे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT