Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

Goa Cabinet Restructure: बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित राहिलेले राज्य मंत्रिमंडळ फेररचनेसह सर्व विषय येत्या महिनाभरात कधीही हातावेगळे केले जातील.

Manish Jadhav

पणजी: बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित राहिलेले राज्य मंत्रिमंडळ फेररचनेसह सर्व विषय येत्या महिनाभरात कधीही हातावेगळे केले जातील. त्यासाठीची माहिती आधीच दिल्लीत पक्षश्रेष्ठींना देण्यात आली आहे. कोणाकोणाबाबत पक्ष संघटनेत नाराजी आहे, जाहीर वक्तव्ये करुन कोणी सरकारला अडचणीत आणले होते, याची माहिती पक्षश्रेष्ठींना आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन याआधी केले आहे. त्यांच्याकडून चार मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना त्या जागी संधी द्या, अशी सूचना करण्यात आली होती. पक्षश्रेष्ठींची मान्यता मिळाली की मंत्रिमंडळ फेरबदल करु, असे भाजपचे (BJP) प्रदेश पातळीवरील नेते संघाच्या नेत्यांना आजवर सांगत आले आहेत.

'विकसित गोवा 2047'

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय जोरात चर्चेला आला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनीही ‘विकसित गोवा 2047’ लक्ष्य गाठण्यासाठी मंत्रिमंडळ फेरबदल आवश्यक असल्याचे म्हटले होते. विधानसभा अधिवेशन झाले आणि हा विषय मागे पडत गेला.

राजकीय घडामोडी

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली होती. तिथे भाजपला आपल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली सरकार आणायचे होते. यासाठी गेले दोन महिने भाजपचे पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातील राजकारणातील घडामोडी घडवण्यात आणि घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यात व्यस्त होते. त्यामुळे गोव्याकडे बघण्यास त्यांना वेळ नव्हता. नाराज आमदार, मंत्री यांनीही आपली नाराजी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्याचा दरम्यानच्या काळात प्रयत्न केला, तरी हा विषय चर्चेत आला नव्हता. प्रदेश पातळीवरून बदल होईल. केवळ दिल्लीतून मान्यता मिळू दे, असे सांगून या नाराज आमदार, मंत्र्यांची समजूत घालण्यात येत होती.

अमोणकरांची प्रतिक्षा

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या 8 आमदारांपैकी केवळ आलेक्स सिक्वेरा यांनाच मंत्रिपद देण्यात आले आहे. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनाही मंत्रिपद देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी आजवर सरकारने देऊ केलेले एकही अन्य पद स्वीकारलेले नाही, असे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT