कोकणी समुद्र साहित्य परिसंवादाचे उदघाटन केल्याचे जाहीर करताना रवीन्द्र भवन मडगावचे अध्यक्ष दामू नाईक. बाजुला वामन टाकेकर, प्रदिप सरमुकादम व डॉ. भुषण भावे. Dainik Gomantak
गोवा

समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनार्थ साहित्यिकांची भुमिका महत्वाची

समुद्री संपत्तीबद्दल साहित्यात ऐतिहासिक दस्तावेज तयार करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: समुद्री तसेच पर्यावरणीय (Environment) जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी साहित्यिकांची भुमिका अतंत्य महत्वाची असल्याचे कोकणी समुद्री साहित्यावरील परिसंवादात सहभागी झालेल्या साहित्यिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले. शिवाय सद्याच्या युगात पारंपारिक  बदला यांत्रिकी मासेमारी (Mechanical fishing)  होत असल्याने समुद्री संपत्ती नष्ट होत चालली आहे, त्यासाठी चिंता व्यक्त करण्यात आली. साहित्य अकादमी, रवीन्द्र भवन व गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रवीन्द्र भवन मडगावच्या सभागृहात कोकणी समुद्री साहित्यावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यानी आपल्या उदघाटनपर भाषणात सांगितले की समुद्री संपत्तीबद्दल साहित्यात ऐतिहासिक दस्तावेज तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे नव्या पिढीला त्याचा फायदा होईल. 2002 साली जैवविविधता संरक्षणार्थ कायदा संमत झाला. त्यापुर्वी परिस्थिती कशी होती व त्यानंतर त्यात काय बदल झाले हे जाणुन घेणे आवश्यक असल्याचे नाईक म्हणाले. शिवाय समुद्री संपत्ती नष्ट होत चालली आहे, त्यासाठी त्यानी चिंता व्यक्त केली. साहित्. अकादमीच्या सल्लागार मंडळाचे निमंत्रक डॉ. भुषण भावे यानी सांगितले की समुद्री संपत्ती, समुद्र परिसर या संदर्भात कोकणी साहित्यात कितपर्यंत नोंद आहे हे जाणुन घेण्यासाठी या परिसंवादाचे महत्व आहे. महाभारत हे समुद्रावर आधारीत प्रथम साहित्य निर्मिती असल्याचेही ते म्हणाले. 90 टक्के वनस्पती समुद्रात आहे व केवळ 10 टक्के वनस्पती जमिनीवर आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विचार साहित्यातुन व्हावा. समुद्राची वेगवेगळी रुपे साहित्यात अवतरली पाहिजेत त्यासाठी समुद्र संबंधीत जे वेगवेगळे शब्द आहेत ते लिहुन जतन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

साहित्यिक वामन टाकेकर यानी पारंपरिक व यात्रिकी मासेमारी संदर्भातील आपले विचार व्यक्त केले. अव्यवहारीक मासेमारीला आळा घालणे आवश्यक असल्याचेही त्यानी स्पष्ट केले. गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदिप सरमुकादम यानी या मंडळाचा या परिसंवादाशी कसा संबंंध येतो याची माहिती विषद केली. पारंपरीक ज्ञान हे मोलाचे आहे. समुद्र संपत्तीला अपरंपार महत्व आहे. केवळ समुद्रीच नव्हे तर पर्ययावरणीय जैवविविधतेचे संवर्धन करणे व त्याचा प्रसार करणे हे मंडळाचे प्रमुख कार्य असल्याचे त्यानी सांगितले. अभ्यासक्रमात सुद्धा पर्यावरणीय विज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आल्याचे त्यानी सांगितले. ज्यांना वैद्यकीय वनस्पतीचे ज्ञान आहे, त्याना ते शोधण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी मंडळातर्फे वैद्य मित्र कार्ड देण्यात आल्याचे त्यानी सांगितले.

कोकणी सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. हनुमंत चोपडेकर यानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना या परिसंवादाचे महत्व सांगितले. त्यानंतर मानसी धाऊस्कर यानी कथा, सखाराम बोरकर यानी लोकसाहित्य व राजय पवार यानी कविता या संदर्भातील समुद्र संबंधीत साहित्यावर आपले विचार व्यक्त केले तर प्रसाद पागी यानी कोकणी साहित्यातील मासेमारी समाज, सुशांत नायक यानी नाटक व प्रकाश वजरीकर यानी कादंबरी संदर्भात प्रपत्र वाचन सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT