Konkani Language Dainik Gomantak
गोवा

Konkani Language: रोहन खंवटे म्हणाले, कोकणी टिकवण्यासाठी 'या' गोष्टी करा

आपल्या मातृभाषेशी जवळीक साधली नाही, तर येणाऱ्या पिढीला ती समजणार नाही. असेही रोहन खंवटे म्हणाले.

दैनिक गोमन्तक

Konkani Language: जर वाचन केले नाही तर आपली बौद्धिक क्षमता कमकुवत होते. आपले अस्तित्त्व सांभाळण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे कोकणी सांभाळण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केले.

संस्कृती भवन पाटो येथे आयोजित दाल्गादो पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी दाल्गाद कोकणी अकादमीचे अध्यक्ष विन्सी कार्दोज, दानियल डिसोजा व्यासपीठावर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले,की आपल्या मातृभाषेशी जवळीक साधली नाही, तर येणाऱ्या पिढीला ती समजणार नाही.

तियात्र, कातारांच्या माध्यमातून रोमी कोकणी आपले अस्तित्व टिकवून असल्याचे त्यांनी सांगितले. वि दाल्गादो कोकणी अकादमीच्या वतीने सायमन फर्नांडिस, पीटर कार्दोजो, फिलिक्स डिक्रुज, थॉमस डिकोस्टा, तियोतीन कोस्ता, फिलोमिना फ्रान्सिस्को आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रोमी लिपीतून शिक्षण द्यावे !

नव्या शिक्षण धोरणात प्रादेशिक भाषांमधून शिक्षण देण्यास अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे कोकणी भाषा देवनागरी लिपीसहित रोमी लिपीतूनही राज्यातील शाळांमधून शिक्षण व्हावे.तरच कोकणी गावागावत पोहोचेल, तिचा विकास होईल.

रोमी लिपीतून शिक्षण देता यावे , यासाठी पुस्तके तयार करण्याचे काम सुरू असून त्यासाठी सरकारच्या पाठिंब्याची देखील गरज आहे,असे दानियल डिसोजा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT