Dainik Gomantak  Goa Crime News
गोवा

Goa Crime News: कुटुंब गणपती उत्सवात दंग, चोरट्यांनी दाखवला रंग; लाखोंचा ऐवज केला लंपास

Goa Crime: अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे या घरावर डल्‍ला मारुन 3 लाखांचे दागिने आणि 1.80 लाखाची रोख असा एकंदर 4.80 लाखांचा ऐवज लंपास केला.

Manish Jadhav

मडगाव: खारेबांद येथील एका घरातील व्यक्ती चतुर्थीसाठी आपले घर बंद करुन दुसरीकडे गेल्‍याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी आज (9 सप्टेंबर) पहाटे या घरावर डल्‍ला मारुन 3 लाखांचे दागिने आणि 1.80 लाखाची रोख असा एकंदर 4.80 लाखांचा ऐवज लंपास केला.

लंगव्‍वा जामुनी या महिलेच्‍या मालकीचे हे घर असून ही चोरी पहाटे 2 वाजल्‍यानंतर झाली असावी असा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. जामुनी यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, चतुर्थी असल्‍याने घरातील मंडळी घर बंद करुन दुसरीकडे गेली होती. घरातील कपाटात दागिने ठेवण्‍यात आले होते. तसेच काही रोख रक्‍कमही ठेवण्‍यात आली होती. अज्ञात चोरट्यांनी दर्शनी दरवाजाला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्‍यानंतर घरातील कपाट फोडून दागिने आणि अन्‍य रोख रक्‍कम पळवली. याच घरात रहाणारा लंगव्‍वा जामुनी हिचा भाचा सागर जामुनी हा सकाळी 5 वाजता आपल्‍या घराकडे आला असता त्‍याने आपल्‍या घरचा तोडलेला दरवाजा पाहिला.

घरात प्रवेश केला असता, कपाट फोडून सामान अत्‍यवस्‍थ पडलेले दिसले. त्‍यानंतर त्‍याने झालेल्‍या प्रक़ाराची खबर मडगाव पोलिसांना दिली. नंतर आपल्‍या मावशीलाही त्‍याची माहिती दिली. त्‍याच्‍या मावशीने सुमारे 50 हजाराची रोख घरात ठेवली होती. तर सागरने घर दुरुस्‍तीसाठी 1.30 लाख रुपये रोख घरात आणून ठेवली होती. हे सर्व पैसे चोरट्यांनी चोरुन नेले असे त्‍याने सांगितले.

आपण गणपती विसर्जन करुन रात्री 2 वाजण्‍याच्‍या सुमारास घराकडे आलो होतो त्‍यावेळी दरवाजा व्‍यवस्‍थित होता. नंतर आपण एकाला मोपा विमानतळावर सोडण्‍यासाठी गेलो. 5 वाजण्‍याच्‍या सुमारास परत आलो असता हा चोरीचा प्रकार आपल्‍या लक्षात आला अशी माहिती सागरने दिली. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्‍हा नोंद केला असून पोलीस तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT