Ponda Road Condition:  Dainik Gomantak
गोवा

Ponda Road Condition: पावसाळा संपला, रस्ते दुरुस्त करा!

Ponda Road Condition: सर्वसामान्यांची मागणी उखडलेल्या रस्त्यावरील खडी, मातीचा प्रवाशांना नाहक त्रास

दैनिक गोमन्तक

Ponda Road Condition: फोंडा तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली असून काही विकासकामांमुळे रस्ते खोदल्याने हे रस्ते पूर्वपदावर येण्यासाठी आणखी किती काळ लागेल, असा सवाल नागरिक विचारताना दिसत आहेत.

फोंड्यासह इतर काही मतदारसंघात मलनिस्सारण तसेच भूमिगत वीजवाहिनी टाकण्याच्या कामामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, त्यामुळे आता पाऊस ओसरल्याने ही विकासकामे त्वरित पूर्ण करून रस्ते पूर्वपदावर आणणे आवश्‍यक आहे.

वीजवाहिनीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे रस्ते पुन्हा खोदण्यात आले. मलनिस्सारण प्रकल्प तसेच घरगुती गॅसवाहिनी टाकण्याच्या कामामुळे फोंड्यात जागोजागी रस्ते खोदण्यात आले होते. त्यामुळे वाचनचालकांना नाहक त्रास होत आहे.

अनियमित पावसामुळे फटका...: राज्यातील अनियमित पावसामुळे रस्त्यांची पार दुर्दशा झाली आहे. कधी मुसळधार तर कधी रिपरिप असे सध्या पावसाचे स्वरूप असून मागच्या दोन ते तीन वर्षांचा आढावा घेतला तर वर्षातील दहा महिने अधूनमधून पाऊस कोसळलेला आहे, हे वास्तव आहे. आताही सार्वजनिक बांधकाम खाते पाऊस ओसरण्याची वाट पाहत आहे, पण पाऊस कधी मुसळधार कोसळेल याचा नेम नाही, त्यामुळे डांबरीकरण केलेले रस्ते वाहून जाण्याचे प्रकारही राज्यात घडलेले आहेत.

सुरळीत वाहतुकीसाठी आणि अपघातमुक्ततेसाठी रस्ते आधी चांगले हवेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांना कंबरेच्या दुखण्याचा त्रास व्हायला सुरुवात झाली असून बऱ्याचदा या खराब रस्त्यामुळे अपघातही होत आहेत, त्यामुळे सरकारने रस्त्यांचे डांबरीकरण त्वरित हाती घ्यावे.
- संदीप पारकर (खांडेपार - फोंडा)
विकासकामे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी सुरू केलेली विकासकामे नियोजित वेळेतच पूर्ण व्हायला हवीत. फोंड्यातील मलनिस्सारण तसेच घरगुती गॅस पाईपलाईन, भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम करताना रस्ते खोदावे लागतात, त्यामुळे प्रत्येकवेळी हे रस्ते खोदण्यापूर्वी एकाच वेळेत अशी कामे हाती घेतली तर पुन्हा पुन्हा रस्ते खोदावे लागणार नाहीत.
- सूरज गरड (पिळये, तिस्क - उसगाव)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT