Road Tax In Goa: Dainik Gomantak
गोवा

Road Tax In Goa: महागड्या वाहनांचा रस्‍ता कर घटला; अधिसूचना जारी

Road Tax In Goa: चारचाकींसाठी 15 लाख, दुचाकींसाठी 1.5 लाख

दैनिक गोमन्तक

Road Tax In Goa: गोवा सरकारने गोवा मोटार वाहन कर (सुधारणा) अध्यादेश 2023 अधिसूचित केला असून महागड्या (हायएंड) वाहनांवरील रस्ता कर कमाल मर्यादा 15 लाख रु., तर मोटारसायकलवरील कर कमाल 1.5 लाख रु. करण्यात आला आहे. भाडेपट्टीवर दिल्या जाणाऱ्या नवीन वाहनांच्या नोंदणीवेळी वर्षाकरीता एकाचवेळी कर भरणेही सोपे केले आहे.

नवीन अधिसूचित रस्ता कर मर्यादा पुढीलप्रमाणे आहे. मोटारसायकल/मोटर स्कूटर/ऑटो रिक्षा त्याची अश्वशक्ती कितीही असो, ज्याची किंमत 1.50 लाख रु. पेक्षा जास्त नाही, त्या वाहनांना किंमतीच्या 9 टक्के रस्ता कर ठरवण्यात आला आहे. मोटारसायकलीच्या अश्वशक्तीचा विचार न करता, ज्याची किंमत 1.50 लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत आहे, त्या दुचाकींना किंमतीच्या 12 टक्के रस्ता कर असेल.

तसेच ज्या मोटारसायकलींची किंमत 3 लाख रुपयांहून अधिक आहे. त्यांना 15 टक्के कर लागू असेल. 4)प्रत्येक ट्रायसायकलसाठी 150 रुपये रस्ता कर ठेवण्यात आला आहे. ज्या वाहनाची

किमत १० लाखांपेक्षा अधिक नाही, त्यांना ९ टक्के, तर १० लाखांपेक्षा अधिक व २० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या वाहनांच्या किंमतीसाठी १२ टक्के रस्ता कर ठेवण्यात आला आहे व २० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या वाहनांसाठी १५ टक्के रस्ता कर लागू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT