Potholes in Panjim Dainik Gomantak
गोवा

Panjim News : नेवगीनगर-ताळगाव रस्‍त्‍यावरील धोकादायक खड्डे अखेर बुजवले

पणजी शहराजवळील नेवगीनगर येथून ताळगावकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim News : पणजी शहराजवळील नेवगीनगर येथून ताळगावकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली होती. मलनि:स्सारण, जलवाहिनी, भूमिगत वाहिन्‍या टाकण्याच्या कामानंतर रस्त्याची डागडुजी व्यवस्थित झाली नव्हती. त्‍यातच पावसामुळे हा रस्ता खड्डेमय झाला होता. याबाबत ‘गोमन्तक’ने वृत्त प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली आणि या रस्‍त्‍याच्‍या दुरुस्‍तीचे काम हाती घेण्‍यात आले.

नेवगीनगर-ताळगाव हा रस्‍ता भाटले येथून जातो. या मार्गावर रात्री उशिरापर्यंत वाहतूक असते. ताळगावातून बसस्थानकाकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा आणि जवळचा आहे. त्यामुळे अवजड आणि लहान-मोठी वाहने दिवस-रात्र येजा करीत असतात. अरुंद असलेल्या या मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होत असते.

मध्यंतरी या रस्‍त्‍याखालून भूमिगत मलनि:स्सारण वाहिनी व जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले. पावसापूर्वी हे काम पूर्ण झाले, पण त्यानंतर रस्त्याची डागडुजी व्यवस्थित झाली नाही. त्‍यामुळे पावसामुळे रस्ता उखडला गेला आणि खड्डेच खड्डे झाले. रस्‍त्‍याचा मशिदीसमोरील भाग तर अपघातांना निमंत्रण देणाराच ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT