Bad Road Condition Dainik Gomantak
गोवा

Bad Road Condition: रेडेघाट ते होंडा रस्ता धोकादायक

Bad Road Condition: वाळपई मार्गावरील रेडेघाट, भुईपाल तसेच होंडा येथील रस्ता खड्डेमय झालेला आहे. यामुळे वाहन चालकांना अनेक स्तरावर डोकेदुखी सहन करावी लागत आहे.

दैनिक गोमन्तक

Bad Road Condition: वाळपई मार्गावरील रेडेघाट, भुईपाल तसेच होंडा येथील रस्ता खड्डेमय झालेला आहे. यामुळे वाहन चालकांना अनेक स्तरावर डोकेदुखी सहन करावी लागत आहे. गेले कित्येक महिने प्रवाशांना या खड्ड्यातून वाट काढावी लागत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, अशी मागणी वाहन चालकांतर्फे करण्यात येत आहे.

रेडेघाट, भुईपाल तसेच होंडा मार्गावर मधोमध अनेक ठिकाणी रस्ता सध्या अत्यंत बिकट अवस्थेत आहे. हा रस्ता मुख्य असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेक स्तरावर अपघात होताना दिसतात. वाळपई रेडेघाट रस्त्यावर गेल्या वर्षी खड्डे मधोमध बुजविण्यात आले होते.

त्याचबरोबर काही दिवसापूर्वी खड्डे पडलेल्या जागी खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र या सर्वांचा काहीच फायदा झालेला नाही. कारण आता अनेक ठिकाणी बारीक मोठे खड्डे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. रेडेघाट हा मार्ग वळणावर असल्याने खड्ड्यांमुळे अनेक स्तरांवर वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागतो. अनेकवेळा पाऊसात खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात सुध्दा होतात.

वाळपई भागात ज्या ज्या ठिकाणी मधोमध खड्डे पडलेले होते. त्या ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले आहे. मात्र हे बुजविलेले खड्डे काही दिवसातच गायब होतात व पुन्हा खड्डे पडतात. कोपार्डे येथे सुध्दा नव्याने करण्यात आलेला रस्त्यावर सुमारे दिड किलो मीटरच्या अंतरावर हॉटमिक्स करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत आहे. दिवाळी नंतर या मार्गावर हॉटमिक्स करण्यात येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT