Quepem Accident Dainik Gomantak
गोवा

Quepem Accident: ट्रकची धडक बसल्‍याने युवक जखमी, खराब रस्ते - खनिज वाहतुकीमुळे वाढला धोका; रिवण - केपेत स्थानिकांची तक्रार

Rivona Quepem Accident: रस्‍ता खोदून ठेवलेला असताना याच मार्गावरून मोठ्या प्रमाणावर खनिज मालाची वाहतूक सुरू झाल्‍याने रिवण - केपे भागात रस्‍त्‍यावरील अपघात वाढू लागले आहेत.

Sameer Panditrao

मडगाव: एका बाजूने जलवाहिनी घालण्‍यासाठी रस्‍ता खोदून ठेवलेला असताना याच मार्गावरून मोठ्या प्रमाणावर खनिज मालाची वाहतूक सुरू झाल्‍याने रिवण - केपे भागात रस्‍त्‍यावरील अपघात वाढू लागले आहेत.

मंगळवारी सकाळी अशाच एका अपघातात नेत्रावळी येथील पांडुरंग नाईक या युवकाला अपघात होऊन त्‍याच्‍या हाताला मार बसल्‍याने त्‍याला मडगावच्‍या जिल्‍हा इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे.

मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्‍याच्‍या सुमारास रिवण येथील फातिमा हायस्‍कूलजवळ हा अपघात घडला. नाईक हे मडगावच्‍या जिल्‍हाधिकारी कार्यालयात काम करतात. आपल्‍या कामावर रुजू होण्‍यासाठी ते दुचाकीने जात असताना रस्‍त्‍यावर थांबलेल्‍या एका बसला ओव्‍हरटेक करताना हा अपघात घडला.

नाईक याच्‍या दुचाकीला खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक बसल्‍याने तो खाली पडला, अशी माहिती स्‍थानिकांनी दिली. मात्र, हा ट्रक घटनास्‍थळी न थांबताच निघून गेला, असे स्‍थानिकांनी सांगितले.

खोदकामामुळे रस्ते खराब

रिवण भागात सध्‍या रस्‍त्‍याच्‍या बाजूला जलवाहिनी घालण्‍याचे काम चालू आहे. त्‍यामुळे रस्‍ता खोदून ठेवला आहे. ज्‍या ठिकाणी जलवाहिनी घालून झालेली आहे. तिथे खड्डे जरी बुजविण्‍यात आले, तरी रस्‍ता ओबडधोबडच आहे.

या परिस्‍थितीत या भागातून सध्‍या खनिज वाहतूक सुरू झाल्‍याने रस्त्यावरून इतर वाहने चालविणे धोक्‍याचे बनले आहे. या अशा परिस्‍थितीमुळे या रस्‍त्‍यावर किरकोळ स्वरूपाचे अपघात वारंवार होत आहेत, अशी तक्रार स्‍थानिकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT