Bicholim Traffic Issue Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: नो पार्किंग, नो एन्ट्री नावालाच; डिचोलीत वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ

Bicholim Traffic Jam: डिचोली शहरात दिवसेंदिवस वाहतूक व्यवस्थेचे ‘तीनतेरा’ वाजत असून, वाहतुकीत बेशिस्तपणा वाढला आहे. वाहतूक नियमांचे पालन होत नसून, बेशिस्त पार्किंगचे प्रकारही सर्रासपणे घडत आहेत, असा दावा डिचोली गट काँग्रेसने केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Traffic Issue Unruly Parking

डिचोली: डिचोली शहरात दिवसेंदिवस वाहतूक व्यवस्थेचे ‘तीनतेरा’ वाजत असून, वाहतुकीत बेशिस्तपणा वाढला आहे. वाहतूक नियमांचे पालन होत नसून, बेशिस्त पार्किंगचे प्रकारही सर्रासपणे घडत आहेत, असा दावा डिचोली गट काँग्रेसने केला आहे.

डिचोली शहरात वाहतुकीत बेशिस्तपणा वाढला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता घडवून आणा, अशी मागणी करीत काँग्रेसतर्फे मंगळवारी डिचोलीच्या वाहतूक पोलिस विभागाला निवेदन दिले आहे.

गट काँग्रेसचे मनोज नाईक व श्रीरंग परब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डिचोलीच्या वाहतूक पोलिस विभागावर धडक देऊन, मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. मुस्ताफा बेग, फिरोज बेग, धावस्कर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. याप्रकरणी लक्ष देण्याचे आश्वासन वाहतूक अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन

बसस्थानकाबाहेरील रस्त्यावर ‘नो पार्किंग’ क्षेत्रात पार्क करण्यात येणाऱ्या दुचाकींमुळे तर बसगाड्या बसस्थानकावर आत घेताना बसचालकांना कसरत करावी लागत आहे. शहरातील ‘नो एन्ट्री’ क्षेत्रातूनही वाहतूक करण्याचे प्रकार वाढले आहेत, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT