Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: टॅक्सी व्यवसायावर विदेशींकडून संकट!

Goa Taxi: किनारी भागात असंतोष : वीज खांबांवर रशियनांची ‘राईड नाऊ टॅक्सी’ जाहिरात

दैनिक गोमन्तक

पर्यटन हंगाम हा किनारी भागातील प्रत्येक व्यावसायिकाला रोजीरोटी मिळवून देणारा काळ असतो. त्यामुळेच कित्येक कुटुंबे बँकांकडून कर्जे घेऊन व्यवसाय थाटतात. परंतु सध्या विशेषतः टॅक्सी व्यवसायात विदेशींनी घुसखोरी केल्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायाला घरघर लागली आहे. हरमल भागातील वीज खांबांवर ''राईड नाऊ टॅक्सी'' अशी रशियन टॅक्सी व्यावसायिकांची जाहिरात झळकत असून स्थानिकांच्या व्यवसायावर संकट ओढवले आहे.

हरमल किनारी भागातील प्रत्येक वीज खांबांवर रशियन पर्यटकांनी टॅक्सी व्यवसायाची ‘क्यू आर कोड’सह ''राईड नाऊ टॅक्सी''अशी जाहिरात केली असून किनारी भागातील स्थानिकांचा टॅक्सी व्यवसाय धोक्यात आल्याची खंत अनेक स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वीज खांबांवर जाहिरात करण्यास मुभा देणाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा रशियनांनी टॅक्सी व्यवसायात बस्तान बसविल्यास गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांनी काय करावे, असा सवालही त्यांना एका टॅक्सी व्यावसायिकाने केला आहे.

पर्यटन व्यवसाय धोक्यात, कारवाईची अपेक्षा !

सध्याच्या टॅक्सीच्या जाहिरातीत 100 डॉलर आकारून विमानतळावर सोडले जाते तसेच 150 डॉलर घेऊन भाडेपट्टीवरील बसेसमधून वॉटरफॉल,स्पाईस प्लांटेशन,चर्चेस व मंदिर असे पॅकेज दिले जाते. या बसेसकडून पर्यटकांची ही लूट नव्हे का, असा सवाल टॅक्सी व्यावसायिकाने केला आहे. माफक दर असूनही पर्यटकांची दिशाभूल केली जाते व त्यास पर्यटन खाते जबाबदार असल्याचे काही टॅक्सी व्यावसायिकांनी सांगितले.

आरोलकरांचे हटविले, मग विदेशींचे पोस्टर्स कसे चालतात ?

वीज खात्याने वर्षभरापूर्वी मांद्रे व अन्य भागात मगो पक्षाचे उमेदवार जीत आरोलकर यांचे वीजखांबावरील जाहिरातीचे पोस्टर्स हटवले होते. मात्र, विदेशींना कोणत्या अधिकाऱ्याने परवानगी दिली त्याची माहिती जनतेला द्यावी, असा आग्रह टॅक्सी व्यावसायिकांनी केला आहे. सदर जाहिरात करण्यास वीज खात्याशी कुणी पत्रव्यवहार केला त्याचाही तपशील प्रसिद्ध करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आ

गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांना मीटर सक्ती, डिजिटल मीटर, स्पीड गव्हर्नन्स आदी बाबतीत वेठीस धरून वाहतूक खात्याने कंगाल केले. सहनशील गोवेकरांनी आर्थिक भुर्दंड सोसला. मात्र काही रशियन स्थानिकांच्या टॅक्सी व्यवसायावर गंडांतर आणत असून त्य-ांच्यावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्होंनी कारवाई करावी. -रिचर्ड अलवारीस, टॅक्सी व्यावसायिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT