Rice seized in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 50 लाखाचा तांदूळ जप्त!

गोव्यात (Goa) विविध ठिकाणी छापे टाकून विक्रीसाठी ठेवलेला मुदत संपून गेलेला 50 लाख रुपयांचा तांदूळ (Rice) वैध मापनशास्र खात्याने जप्त केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यभरात (Goa) विविध ठिकाणी छापे टाकून विक्रीसाठी ठेवलेला मुदत संपून गेलेला 50 लाख रुपयांचा तांदूळ (Rice) वैध मापनशास्र खात्याने जप्त केला. खात्याने केलेल्या कारवाईत प्रत्येकी 25 किलोच्या 3 हजार 96 गोण्या जप्त करण्यात आल्या.

सहायक नियंत्रक नितीन पुरूशन, सहायक नियंत्रक देमू मापारी, सहायक नियंत्रक गुलाम गुलबर्ग, निरीक्षक विकास कांदोळकर, सुधीर गावकर, देवानंद फडते, नितेश नावेलकर, पास्कोल वाझ, मेल्विन फुर्तादो यांनी हे छापे नियंत्रक प्रसाद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली टाकले. त्यांनी झुआरीनगर येथे दोन छापे टाकून 1 हजार 950 गोण्या जप्त केल्या. त्या गोण्यांवर उत्पादकाचे पूर्ण नाव व पत्ता नोंदवलेला नव्हता. ग्राहक तक्रार निवारण क्रमांकही नोंदवण्यात आलेला नव्हता. त्यापैकी 500 गोण्यांवर वैधतेच्या मुदतीच्या तारखेत खाडाखोड केल्याचेही आढळून आले.

मावळिंगे येथे 500 गोण्या जप्त केल्या. तेथे तांदूळ कधी गोण्यांत भरला याची तारीख त्या गोण्यांवर नोंदवलेली नव्हती. खोर्ली येथे 496 गोण्या जप्त केल्या. फोंडा येथे 150 गोण्या जप्त केल्या. वैध मापनशास्त्र कायद्यानुसार प्रत्येक गोणीवर उत्पादकाचे नाव व पत्ता, गोणीत माल भरल्याची तारीख, कधीपर्यंत माल वापरणे इष्ट त्याची तारीख, उत्पादनाचे सर्वसाधारण नाव, ग्राहक तक्रार निवारण क्रमांक, जास्तीत जास्त किरकोळ किंमत आदी माहिती नोंदवणे आवश्यक असते. वस्तू आयातीत असेल, तर आयात करणाऱ्याचे नाव व पत्ताही नोंदवावा लागतो. याचे उल्लंघन झाल्याचे ग्राहकांना आढळल्यास 0832-2416432 किंवा 2412037 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन खात्याने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT