Illegal Hill Cutting | Aires Rodrigues Dainik Gomantak
गोवा

Hill Cutting : रायबंदर डोंगर कापणी परवाना 'एनजीपीडीए'कडून मागे; ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केली होती तक्रार

कदंब पठावरील रायबंदरच्या भागात येणाऱ्या डोंगर कापणी प्रकरणात सर बायोटेक इंडिया प्राव्हेट लिमिटेडला दिलेली परवानगी उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (एनजीपीडीए) मागे घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

Illegal Hill Cutting : कदंब पठावरील रायबंदरच्या भागात येणाऱ्या डोंगर कापणी प्रकरणात सर बायोटेक इंडिया प्राव्हेट लिमिटेडला दिलेली परवानगी उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (एनजीपीडीए) मागे घेतली आहे. डोंगर कापणी केल्यासंबंधी एनजीपीडीने कंपनीला अनियमित आणि नियमांचे उल्लंघन केल्याची कारणे दाखवा नोटीस बाजवली होती.

सदर प्रकरणात आरटीआय कार्यकर्ते ॲड.आयरिश रॉड्रिग्ज यांनी कदंब पठारावरील रायबंदरच्या भागात बेकायदेशीररीत्या डोंगर कापणी होत असून ही दूर चोडण येथून देखील दिसत असल्याची तक्रार नगर नियोजन खात्यात केली होती. याची गंभीर दखल घेऊन नगर नियोजन मंत्री विश्‍वजित राणे यांनी काम सुरू असलेल्या भागाची पाहणी केली होती.

येथील उतरणीवरील क्षेत्र ना विकोस क्षेत्र केला जाईल, तसेच बांधकामासाठी कशी काय परवानगी देण्यात आली याची चौकशी करणार असल्याचे राणे यांनी सांगितले होते.

या घटनेनंतर एनजीपीडीएचे सदस्य सचिव आर. पंडिता यांची प्राधिकरणातून उचलबांगडी करण्यात आली होती. गेली अनेक वर्ष ते एनजीपीडीएमध्ये ठाण मांडून बसले होते.

एनजीपीडीएच्या अध्यक्षा आमदार जेनिफर मोन्सेरात असल्या तरी त्यांचे पती मंत्री बाबूश मोन्सेरात यांचा कथित डोंगर कापणीला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT