Manoj Parab X
गोवा

Goa University VC: 'मुक्ताफळे उधळणाऱ्या कुलगुरूंनी गोमंतकीयांची माफी मागावी'! मनोज परब यांची मागणी

Manoj Parab: स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशाप्रकारची मुक्ताफळे उधळणाऱ्या कुलगुरूंनी या सर्व गोमंतकीयांची माफी मागावी, असे विधान ‘आरजी’चे नेते मनोज परब यांनी केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा विद्यापीठात रहिवासी दाखल्याची अट असल्याने मोठ्या प्रमाणात गोमंतकीय प्राध्यापक असून त्यांच्यामुळे रॅंकिंग घटत असल्याचे विधान कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांनी केले आहे. हे विधान गोमंतकीयांचा अपमान करणारे आहे. आपला स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशाप्रकारची मुक्ताफळे उधळणाऱ्या कुलगुरूंनी या सर्व गोमंतकीयांची माफी मागावी, असे विधान ‘आरजी’चे नेते मनोज परब यांनी केले आहे.

पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनोज परब बोलत होते. यावेळी आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते. दरम्यान, परब म्हणाले की, ज्यावेळी विद्यापीठाचे प्रमुख गोमंतकीय होते, त्यावेळी या विद्यापीठाचे रॅंकिंग अतिशय चांगले होते; परंतु आता मागील काही वर्षांत सातत्याने रॅंकिंग घटत आहे.

आपल्या स्वतःच्या लोकांना विद्यापीठात नोकरी द्यायचा हा त्यांचा डाव आहे. कुलगुरू प्रो. मेनन यांनी यापूर्वीदेखील अशाप्रकारची विधाने केली आहेत. वारंवार गोमंतकीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख आणि शिक्षणमंत्री म्हणून या प्रकाराबाबत कुलगुरूंना तंबी देणे गरजेचे आहे.

असली विधाने केरळात करावी!

गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. मेनन हे केरळ राज्याचे आहेत. त्यांच्या राज्यातील विद्यापीठात देखील स्थानिक रहिवासी, अशी अट आहे. अशाप्रकारचे विधान त्यांनी पहिल्यांदा आपल्या राज्यात करावे आणि पाहावे की त्यांच्या या विधानाचा कशाप्रकारचा समाचार घेण्यात येईल. कुलगुरू प्रो. मेनन हे मऊ माती पाहून खोदण्याचा प्रयत्न करत आहेत. ते गोमंतकीय प्राध्यापक आणि गोमंतकीयांचा वारंवार अपमान करत असल्याचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT