Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab: 'भाजपला आम्हीच एकमेव विरोधक, कुणाचीही 'बी' टिम नाही'

मनोज परब यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात 2027 च्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) रिव्हॅल्युशनरी गोवन्स पार्टी हा एकमेव विरोधक असेल, तसेच आरजीपी कुणाचीही 'बी' टिम नाही. असा खुलासा रिव्हॅल्युशनरी गोवन्स पार्टीचे (RGP) अध्यक्ष मनोज परब (Manoj Parab) यांनी केला. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षाच्या प्रमुखांना भेटल्यानंतर परब गोव्यात दाखल झाले आहेत.

मनोज परब यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांची भेट घेतली. सुरूवातीला परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर परब शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली. मनोज परब यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना ऊत आले. दरम्यान, या सर्वांवर मनोज परब यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले मनोज परब

"रिव्हॅल्युशनरी गोवन्स पार्टी फक्त प्रादेशिक पक्षाच्या प्रमुखांना भेटली. प्रादेशिक पक्षांची भुमिका आणि योजना जाणून घेण्यासाठी ही भेट होती. आम्ही आमच्या विचारधारेशी कोणतीही तडजोड करणार नाही. पोगो बिल पुन्हा घेऊन येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आरजीपी कोणत्याही पक्षाची बी टिम नाही. गोव्यात 2027 च्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) रिव्हॅल्युशनरी गोवन्स पार्टी हा एकमेव विरोधक असेल. 2027 मध्ये भाजप विरूद्ध आरजीपी अशीच लढत असेल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT