Revolutionary Goans  Dainik Gomantak
गोवा

‘आरजी‘तर्फे युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण वर्गांचे आयोजन

यावेळी आरजीचे विश्‍वेश नाईक, मयुर आर्सेकर आणि सनिष तिळवे आदी उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

फोंडा: रेव्होल्युशनरी गोवन्सतर्फे बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खास प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातील दुचाकी मॅकेनिक प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ होत असून त्यासंबंधीची माहिती फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आरजीचे विश्‍वेश नाईक, मयुर आर्सेकर व सनिष तिळवे आदी उपस्थित होते.

दहा युवकांनी या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला असून त्यांना बंगलोर येथे हे तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. एसकेएफ बेअरिंग आस्थापनातर्फे हे प्रशिक्षण पुरस्कृत करण्यात आले असून गटाला थेट रोजगाराची संधी मिळणार आहे. आठवी उत्तीर्णांना तसेच पंचवीस वयोगटापर्यंतच्या प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात आला असून त्यांना बंगलोर येथील प्रशिक्षणासंबंधीची आगाऊ माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: योग दिनावरून राजकारण करू नका!

खेळता-खेळता काळाने घातला घाला! मांगोरहिल येथे तीन वर्षीय बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वर्षभरानंतर गोमंतकीयांना प्रतिदिनी हजार लीटर पाणी, 325 एमएलडी क्षमतेचे 11 जलशुद्धीकरण प्रकल्‍प

16 FDC Drugs Banned: 16 एफडीसी औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी मोठा निर्णय

मुदतपूर्व निवडणुकीची सज्जता, भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रणनीतीवर खल; 40 जागा लढवून 30 जिंकण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT