Protest  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics| भाजपच्या विरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाची आझाद मैदानावर निदर्शने

त्या 8 आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचा इशारा दिला रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने दिला.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे 2/3 विभाजन केल्याबद्दल भाजपच्या विरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने आझाद मैदानावर निदर्शने केले आहेत; दरम्यान याला लोकशाहीची हत्या म्हणतात; त्या 8 आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचा इशारा दिला रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने दिला.

(Revolutionary Goans Party protests against BJP at Azad Maidan in goa)

आपचे काँग्रेस पक्षाला आव्हान:

या पूर्वी आपने देखील आवाज उठवला होता. आमदारांनी गद्दारी करून पक्ष सोडला असे म्हणत गळा काढून रडून लोकांची सहानुभूती घेण्याऐवजी काँग्रेसने हिंमत असल्यास जे आमदार शपथपत्र मोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा असे आव्हान आम आदमी पक्षाने दिले. काँग्रेस पक्षाचे आठ आमदार पक्ष सोडून भाजप पक्षात गेले याचा निषेध करण्यासाठी आज आप कार्यकर्त्यांनी येथील मडगाव लोहिया मैदानावर निषेध सभा आयोजित केली होती.

काँग्रेसच्या आठ आमदारांचा गट भाजपमध्ये

काँग्रेसच्या आठ आमदारांच्या गटाने आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना मायकल लोबो यांनी याबाबत घोषणा केली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळाला आम्ही कंटाळलो होतो. त्या पक्षात आपल्याच नेत्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं मायकल लोबो यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच आपल्या भाजप प्रवेशामुळे संपूर्ण बार्देश तालुक्यात आनंदाचं वातावरण असल्याचंही लोबो म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: IND vs PAK मॅच होणार नाही! आशिया कपमधून पाकिस्तान 'आऊट', आता 'या' देशाच्या संघाला मिळणार संधी

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT