viresh borkar Dainik Gomantak
गोवा

RGP Internal Dispute: खोलकरांच्‍या बडतर्फीच्‍या आदेशाला बोरकरांकडून वाटाण्‍याच्‍या अक्षता; 'मीच राष्ट्रीय अध्यक्ष!' म्हणत वीरेश बोरकरांनी ठोकला दावा

Viresh borkar On RGP Internal Dispute: राष्‍ट्रीय अध्‍यक्ष या नात्‍याने आपण बडतर्फीचा आदेश जारी केलेल्‍या विश्‍‍वेश नाईक यांना आधीच पक्षातून निलंबित केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचा (आरजी) राष्‍ट्रीय अध्‍यक्ष असल्‍याचा दावा करीत आमदार वीरेश बोरकर यांनी बंद केलेले पक्षाचे पाटो–पणजी येथील कार्यालय अजय खोलकर व त्‍यांच्‍या समर्थकांनी सोमवारी खुले करीत आमदार बोरकर यांना पक्षातूनही बडतर्फ केले. परंतु, ‘राष्‍ट्रीय अध्‍यक्ष या नात्‍याने आपण बडतर्फीचा आदेश जारी केलेल्‍या विश्‍‍वेश नाईक यांना आधीच पक्षातून निलंबित केले आहे.

त्‍यामुळे हा आदेश अवैध ठरतो. पक्षाचे सर्व अधिकार अजूनही आपल्‍याकडेच आहेत’, असे आमदार बोरकर यांनी स्‍पष्‍ट केले. त्‍यामुळे आरजीपीतील अंतर्गत वाद आणखी भडकण्‍याची शक्‍यता आहे. गेल्‍या काही महिन्‍यांपासून आरजीपीमध्‍ये सुरू असलेले अंतर्गत घमासान अजूनही कायम आहे. आमदार बोरकरांवर टीकेची झोड उठवत मनोज परब यांनी अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर पक्षात बोरकर विरुद्ध अजय खोलकर–विश्‍‍वेश नाईक असे दोन गट तयार झाले.

या दोन्‍ही गटांकडून एकमेकांवर आरोप–प्रत्‍यारोप होत असतानाच, काहीच दिवसांपूर्वी वीरेश बोरकर यांनी स्‍वत: आरजीपीचा राष्‍ट्रीय अध्‍यक्ष असल्‍याचे सांगत पक्षाचे कार्यालय बंद केले होते. कार्यालयातील महत्त्‍वाची कागदपत्रे, सदस्‍य नोंदवह्या, आर्थिक नोंदी यांसारखी महत्त्‍वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्‍यासाठी कार्यालय बंद केले असून, आपल्‍या लेखी संमतीशिवाय पदाधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्‍याचेही त्‍यांनी जारी केलेल्‍या आदेशात म्‍हटले होते.

परंतु, खोलकर आणि त्‍यांच्‍या समर्थकांनी सोमवारी सायंकाळी कार्यालय उघडले. ‘आमदार बोरकर यांचा आदेश वैयक्तिक होता. त्‍याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. दुसरीकडे, स्‍वत: आरजीपीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष असल्‍याचा कोणताही पुरावा बोरकर यांनी सादर केलेला नाही. त्‍यामुळेच कार्यालयाच्‍या

मालकाशी चर्चा करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच आम्‍ही कार्यालय उघडले’, असे खोलकर यांनी स्‍पष्‍ट केले आणि त्‍यानंतर रात्री सरचिटणीस विश्‍‍वेश नाईक यांनी आमदार बोरकर यांना पक्षातून बडतर्फ करीत असल्‍याचा आदेश जारी केला. दरम्‍यान, आमदार बोरकर यांनी काही दिवसांपासून पक्ष स्‍वत:च्‍या ताब्‍यात घेण्‍याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्‍याबाबत त्‍यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाशी संपर्क साधला असून, तेथे प्रक्रिया सुरू असल्‍याचे सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

आदेशात म्‍हटले आहे...

तुमची सततची बेशिस्त, गैरवर्तन, पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या घटनेचे उल्लंघन विचारात घेऊन तुमचे प्राथमिक सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय ‘आरजीपी’ने घेतला आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्याला १६ एप्रिल २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

त्यानंतर, २१ एप्रिल २०२६, ६ मे २०२६, १५ जून २०२६ आणि १८ जून २०२६ रोजी स्मरणपत्रे बजावण्यात आली. आपली बाजू मांडण्यासाठी वारंवार संधी आणि पुरेसा वेळ देऊनही, आपण कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण आणि उत्तर देण्यास अयशस्वी ठरला आहात. तुम्ही पक्ष ताब्यात घेण्याची, पक्षात फूट पाडण्याची किंवा पक्षाचे विलीनीकरण करण्याची योजना आखून, पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्रियपणे कट रचला.

हा कट मडगाव येथे झालेल्या बैठकीपासून सुरू झाला आणि त्यानंतर पक्षाला व त्याच्या लोकशाही पद्धतीने स्थापित नेतृत्वाला अस्थिर करण्याच्या उद्देशाने केलेल्या विविध समन्वित कृतींद्वारे तो पुढे चालू राहिला, ज्यात केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीदरम्यान केलेल्या आंदोलनाचाही समावेश होता.

खोलकरांचा भंडारी समाजाकडून निषेध

अजय खोलकर यांनी आमदार वीरेश बोरकर यांना ‘गड्डो आमदार’ म्‍हणून हिणवल्‍यामुळे भंडारी समाज आक्रमक झाला आहे. अजय खोलकर यांनी आमदार बोरकरांबाबत असे वक्तव्‍य करून संपूर्ण भंडारी समाजाचा अपमान केलेला आहे. त्‍यामुळे आम्‍ही त्‍यांचा निषेध करीत असून, त्‍यांनी तत्‍काळ बोरकर आणि समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही भंडारी समाजाने केली आहे.

आपल्‍याला बडतर्फ करण्‍याचा आदेश बेकायदेशीर आणि निरर्थक आहे.

आरजीपीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष या नात्‍याने विश्‍‍वेश नाईक यांना याआधीच आपण पक्षातून निलंबित केलेले आहे. त्‍यामुळे नाईक यांनी आपल्‍याबाबत जारी केलेला बडतर्फीचा आदेश अवैध ठरतो.

आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने घटनेनुसार पक्षाच्या सर्व समित्या आपण बरखास्त केल्या आहेत. त्यामुळे, त्या समित्यांनी घेतलेल्या कोणत्याही कारवाईला कायदेशीर किंवा संघटनात्मक आधार नाही. पक्षाचे सर्व घटनात्मक अधिकार आपल्याकडेच असून, या अलीकडील कृतींमागील उद्देश लवकरच जनतेसमोर आणले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dengue Cases In Curti: डेंग्यूचे कुर्टीत आक्रमण! फोंड्यात 20 रुग्ण सापडले, आरोग्य खात्याकडून स्वच्छता व फॉगिंग मोहिमेची तयारी

Horoscope: मंगळवार ठरणार शुभ! बजरंगबलीच्या कृपेने 'या' राशींना यश, धनलाभ आणि आनंदवार्ता मिळण्याचे संकेत

El Nino Heavy Rainfall Maharashtra: जुलैमधील अतिवृष्टीला 'एल निनो'च कारणीभूत; मॉन्सूनचा प्रवाह क्षीण असताना समुद्रावरील बाष्पामुळे उंच ढगांची निर्मिती

PoK Election Violence: "गोळीबार, हत्या अन् मतपेट्यांची जाळपोळ!" पीओकेत निवडणुकीदरम्यान रक्तापात; पोलिसांच्या फायरिंगमध्ये 9 जणांचा मृत्यू

Rajesh Naik Fee Scam Case: 60 कोटींचा शुल्क घोटाळा; माजी मुख्य नगरनियोजक राजेश नाईक यांच्या 'क्लिन चिट'ला उच्च न्यायालयात आव्हान

SCROLL FOR NEXT