Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भरत परब हे मनोज परबांचे वडील असल्याचा खोटा दावा, बनावट व्हिडिओविरोधात RGP कडून तक्रार दाखल

Manoj Parab: आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांच्याविरोधात चुकीची व बदनामीकारक माहिती सोशल माध्यमातून पसरवणाऱ्या व्हिडिओविरोधात पक्षाने बुधवारी रायबंदर येथील सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली.

Sameer Amunekar

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब यांच्याविरोधात चुकीची व बदनामीकारक माहिती सोशल माध्यमातून पसरवणाऱ्या व्हिडिओविरोधात पक्षाने बुधवारी रायबंदर येथील सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांच्याकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाईक यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, सोशल मीडियावर एक बनावट आणि चुकीचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ''भरत परब'' नावाच्या व्यक्तीला मनोज परब यांचे वडील असल्याचा खोटा दावा करून अष्टगंध क्रेडिट सोसायटी प्रकरणाशी त्यांचा संबंध दर्शविण्यात आला आहे.

आरजीपीने स्पष्ट केले की, या व्हिडिओतील व्यक्तीचा मनोज परब यांच्याशी कोणताही नातेसंबंध नाही आणि त्यांच्या वडिलांचा अशा कोणत्याही गैरव्यवहाराशी काहीही संबंध नाही. तक्रारीसोबत पक्षाने संबंधित व्हिडिओचे स्क्रीनशॉट, लिंक आणि इतर पुरावे सायबर पोलिसांना दिले आहेत.

पक्षाने म्हटले आहे की, या प्रकारामुळे पक्षाची आणि नेत्यांची सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि हे गंभीर स्वरूपाचे सायबर गुन्हेगारीचे प्रकरण आहे.

व्हिडिओ तयार करणारे आणि प्रसारित करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना चौकशीसाठी पाचारण करावे अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

तसेच युट्युब व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना व्हिडिओ तत्काळ हटविण्याचे निर्देश द्यावेत, संबंधितांवर कायदेशीर कलमांखाली गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुकवरील पोस्ट्सचा डिजिटल मागोवा घेऊन आयपी लॉग्स आणि अ‍ॅडमिनची माहिती गोळा करावी आणि खोटी व बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्या ग्रुप्स व युट्युब चॅनेल्सना इशारा देऊन सायबर जनजागृती नोटीस पाठवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.पोलिसांनी पुढील तीन दिवसांत पक्षाला चौकशीसाठी बोलावले जाईल, असे खात्रीपूर्वक आश्वासन दिल्याचे पक्षावतीने सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

Viral Video: रस्त्याच्या मधोमध सांडांची WWE स्टाईल फाईट! स्कूटीवरुन जाणारी तरुणी सापडली कचाट्यात; थरारक व्हिडिओ व्हायरल

Goa News: चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करा; आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांची मागणी

Goa Assmbly Live: लाटंबार्से औद्योगिक वसाहतीसाठी 38 कोटींचे वीज उपकेंद्र तातडीने उभारा; आमदार चंद्रकांत शेट्ये यांची सरकारकडे मागणी

Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये वाढता रक्तदाब ठरु शकतो जीवघेणा! आई आणि बाळासाठी धोक्याची घंटा; जाणून घ्या 'प्री-एक्लेम्पसिया'ची लक्षणे

SCROLL FOR NEXT