Revolutionary Goans Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

‘धर्माच्या नावाखाली भाजपचे राजकारण’

रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे सर्वेसर्वा मनोज परब यांची घणाघाती टीका

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात धर्मांतरणविरोधी कायदा आणण्याचा इशारा देऊन भाजप सरकार धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. त्यांनी हा कायदा आणण्यापूर्वी त्याचे स्वरूप कशा प्रकारचे असेल, हे अगोदर स्पष्ट करायला हवे. त्यानंतर त्याचा उल्लेख करण्याची गरज आहे, असे मत रिव्होल्युशनरी गोवन्सचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी व्यक्त केले.

राज्यातील परप्रांतीय हे बऱ्याचदा धर्मांतरण करण्याकडे वळतात. हे परप्रांतीय भाजप सरकार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. धर्मांतरण केलेल्यांची त्यांचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपचा त्यामागील हा छुपा एजंडा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. धर्मांतरण करणे योग्य नाही. प्रत्येक धर्माबरोबर अनेकांच्या भावना जुळलेल्या असतात. त्याला लोकांनी धर्मांतरण करून तडा जाऊ देऊ नये. कोणाचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करण्यात येऊ नये, असे परब म्हणाले.

पोर्तुगीज काळात धर्मांतर करताना मंदिरे पाडण्यात आली. ही मंदिरे पुन्हा बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, हे सरकार विविध प्रकल्पांसाठी लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहे, ज्या ठिकाणी त्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून देवस्थाने, धर्मस्थळे आहेत.

मोपा विमानतळासाठी लाखो चौरस किलोमीटर जागा ताब्यात घेण्यात आली. मात्र, त्यावेळी तेथील लोकांच्या जमिनीत असलेल्या धार्मिक स्थळांचा विचार केला गेला नाही, अशी टीका रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT