Revolutionary Goans Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

'भाजपची निदर्शने म्हणजे केवळ नाटक'

गोवा शिपयार्डमध्ये नोकरीसाठी गोवेकरांनाच प्राधान्य द्या; मनोज परब आक्रमक

दैनिक गोमन्तक

वास्को : गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या मुख्य गेटबाहेर भाजपच्या नेत्यांनी रोजगाराच्या मागणीसाठी केलेली निदर्शने हे नाटक होते, असा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्सचे संस्थापक मनोज परब यांनी केला आहे. गोवा शिपयार्डच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर परब पत्रकारांशी बोलत होते. (Revolutionary Goans Manoj Parab)

गोवेकरांना नोकरीपासून डावलण्यात येते, याचा निषेध म्हणून ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब तसेच आमदार वीरेश बोरकर आपल्या समर्थकांसह काल बुधवारी गोवा शिपयार्डसमोर जमले होते. यावेळी मनोज परब आणि वीरेश बोरकर यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी मनोज परब म्हणाले की, आरजीच्या संस्थापकांनी माहिती हक्क कायद्याखाली गोवा शिपयार्डमध्ये किती गोवेकर नोकरीला आहेत, यासंदर्भात माहिती मागवून गोव्यातील तरुणांना कामावर ठेवण्याची मागणी केली आहे.

मनोज परब म्हणाले की, भारतातील प्रत्येक उद्योग, व्यवसायात रिक्त पदाची जाहिरात करतात. भरतीसाठी स्थानिक भाषा अनिर्वाय करते. तथापि, गोवा शिपयार्डमध्ये गोवेकरांकडे कौशल्य असतानाही बाहेरील लोकांची भरती केली जाते. आरजीने ‘जीएसएल’मध्ये गोमंतकीय लोकांच्या भरतीचा मुद्दा यापूर्वीच उपस्थित केला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना निवेदनही दिले आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष गोव्यात नोकर भरतीचा मुद्दा उपलब्ध करण्यास अत्यंत अपयशी ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT