Revolutionary Goans Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans : आपच्या अमित पालेकरांना आरजीचे सल्ले

ॲड. पालेकर यांनी केलेल्या विधानाचा आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला.

दैनिक गोमन्तक

पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्सचे (आरजी) पोगो विधेयक लोकांना फसवित आहे. आरजी हे विधेयक केवळ नावासाठी विधानसभेत पाठवणार, आरजीने विधेयक मांडायला घाई केली आणि आम आदमी पक्षाला अजिबात विश्‍वासात घेतले गेले नाही, असे ॲड. अमित पालेकर सांगतात. ॲड. पालेकर यांनी केलेल्या विधानाचा आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. त्याचबरोबर त्यांनी पालेकर यांना विविध सल्लेही दिले.

परब म्हणाले की, ज्या मतदारसंघातून पालेकर निवडणूक लढवितात, त्या सांताक्रूझ मतदारसंघातील इंदिरानगरातील अतिक्रमणावर त्यांनी बोलावे. मनोज परब म्हणाले की, कलम 19 अंतर्गत देशात कोणीही कोठेही राहू शकतात, असे पालेकर सांगतात आणि पोगो विधेयकाला विरोध करताना आपच्या आमदाराने 80 टक्के गोवेकरांसाठी राखीवता मागितली आहे. यावरून पालेकर वेगवेगळी मते व्यक्त करताना दिसतात. गोव्यातील जनतेसाठी पोगो बिल आणायला हवे म्हणून तुम्ही एका बाजूला सांगता. पालेकर यांनी कलम 19 आणि गोवन्स कोण? हे स्पष्ट करावे.

‘पालेकरांनी मंजूर विधेयके वाचावीत’

जुने गोवे येथील बांधकामाविरोधात पालेकर यांनी आंदोलन केले, पण ते बांधकाम अजूनही तसेच आहे, हे पालेकर यांना लक्षात येत नाही का? हरियाणा सरकारने 75 टक्के स्थानिकांना आरक्षण दिले आहे. आंध्र प्रदेशानेही अशा आरक्षणाचे विधेयक मंजूर केले आहे. पालेकर यांनी दोन्ही राज्य सरकारची मंजूर विधेयके वाचावीत, असेही परब यांनी त्यांना सूचवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT