Manoj Parab Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

आरजी नेते मनोज परब यांनी 'हे' आरोप खोडून काढले

पत्रकार परिषदेत मनोज परब म्हणाले की, गोवा सुराज पक्षाचे (Goa Su-Raj Party) नेते इनासिओ वाझ यांनी निवडणुकीत पाच जागांची मागणी केली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा सुराज पक्षाने रेव्हॉल्युशनरी गोअन्सला मदत करताना त्यांचा छुपा अजेंडा उघड केला नव्हता. मात्र, उमेदवार घोषित करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मर्जीतील काही व्यक्तींना उमेदवारी देण्याचा दबाव आणल्याने त्यांच्याशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेण्यात आला असे खंडन करत आरजीचे (Revolutionary Goans) नेते मनोज परब यांनी त्यांचे आरोप खोडून काढले. (Revolutionary Goans leader Manoj Parab Latest News)

यावेळी पत्रकार परिषदेत मनोज परब म्हणाले की, गोवा सुराज पक्षाचे (Goa Su-Raj Party) नेते इनासिओ वाझ यांनी निवडणुकीत पाच जागांची मागणी केली होती तसेच दाबोळी येथील मतदारसंघात कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्याविरुद्ध उमेदवार उभा न करण्याची अट घातली होती. त्यांचे दिवसेंदिवस सल्ले देण्याचे सुरू झाल्यावर त्यांना दूर ठेवण्यात आले. मिकी पाशेको यांच्याकडून मदत घेऊन आरजीविरुद्ध ते आरोप करत सुटले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा किंवा आरोप सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा परब यांनी दिला.

गोवा सुराज पक्षाने स्वच्छेने आरजीला निवडणूक (Election) लढवण्यासाठी मदत करण्यास पुढे आले होते. त्यावेळी जागा वाटपासंदर्भात कोणतीच चर्चा झाली नव्हती. त्यामुळे यापुढे त्यांनी आणखी काही आरोप केले तर त्याचे ध्वनिमुद्रण करून हे प्रसारमाध्यमांसमोर आणून पर्दाफाश करू, असे परब यांनी सांगितले. गोवा सुराज पक्षाचे नेते गोमंतकीयांच्या हिताचे तसेच रोजगार मिळण्यास महत्वाचे असलेले पोगो विधेयक लोकांपर्यंत निवडणुकीवेळी नेऊ नका असे सांगत होते. जेव्हा आरजी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळून चिन्ह देण्यात आले तेव्हा त्यांना त्याची माहिती देण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT