Congress In Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील पराभवानंतर काँग्रेसचा आढावा; पदभार सोहळा

सोमवारी पणजीत खास कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने प्रथमच आढावा बैठक बोलावली आहे. यानिमित्ताने पक्षाचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम आणि गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव सोमवारी 11 एप्रिलला गोव्यात येत आहेत. यावेळी नव्याने नियुक्त झालेले गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर, कार्याध्यक्ष युरी आलेमाव, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विरेन शिरोडकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सावियो डिसोझा यांना पदभार देण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या रजनीताई पाटील यांच्या उपस्थित उमेदवारांसोबत चर्चा झाली होती. त्याचा अहवाल केंद्रीय पदाधिकाऱ्यांना पर्यंत पोहोचला. यानंतर पक्षाने प्रदेशाध्यक्षासह इतर महत्त्वाच्या निवडी जाहीर केल्या. आता सोमवारी यावर सविस्तर चर्चा अपेक्षित असून या बैठकीत विरोधी पक्षनेते पदाबाबत केंद्रीय नेत्यांनी घेतलेले निर्णयाबाबत सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना देणार येणार आहे. यानंतर सांतेनेज येथील एका हॉटेलमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदभार देण्यात येईल. यावेळी दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. दरम्यान, कामत यांच्या कथित नाराजी नाट्यावर बैठकीत काही चर्चा होईल का याकडे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

SCROLL FOR NEXT