Minister Babush Monserrate: Dainik Gomantak
गोवा

Minister Babush Monserrate: अतिक्रमणाची प्रकरणे वर्षभरात निकाली काढू

Minister Babush Monserrate: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या अधिवेशनात कोमुनिदादच्या जमिनींवरील बेकायदा अतिक्रमणांची प्रकरणे वर्षभरात निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमन्तक

Minister Babush Monserrate: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या अधिवेशनात कोमुनिदादच्या जमिनींवरील बेकायदा अतिक्रमणांची प्रकरणे वर्षभरात निकाली काढण्याचे आश्वासन दिले. अशा बेकायदेशीर गोष्टींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मोन्सेरात यावेळी म्हणाले.

मंत्री मोन्सेरात हे कोमुनिदाद अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उदघाटनांनंतर मोन्सेरात म्हणाले की, गोव्यात सुमारे २२३ कोमुनिदाद आहेत. त्यात उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन विभाग आहेत. कोमुनिदाद संरचना ही कोमुनिदाद प्रणालीच्या सदस्याचे नियम आणि कर्तव्ये परिभाषित करते.

या संहितेमुळेच कोमुनिदाद प्रणाली सुरळीतपणे कार्यरत आहे. गोव्यातील कोमुनिदादींच्या जमिनींवर बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे आहेत. ही प्रकरणे एका वर्षात निकाली काढण्यात येतील.

कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण शोधण्यासाठी क्षेत्र सर्वेक्षण अधिकारी पाठविण्यात आले आहेत. या अधिवेशनात कोमुनिदाद सदस्यांनी मांडलेल्या सूचना आणि हरकतींचे सरकार स्वागत करेल, असेही मोन्सेरात म्हणाले.

कोमुनिदाद अधिवेशनाचे समन्वय ॲड. सावियो कुरैया कार्यक्रमानंतर ‘गोमन्तक’शी संवाद साधताना म्हणाले की, आजचा प्रकार हा धक्कादायक होता. कोमुनिदाद संरचनेत अगोदर जरी महिलांचा समावेश नसला, तरीही २१ व्या शतकात जिथे महिला सर्व क्षेत्रात नाव करत आहेत, त्या महिलांना कोमुनिदाद संरचनेत स्थान देण्यासाठी हवे ते बदल करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT