Retired engineer's argument continues in power concession scam case Dainik Gomantak
गोवा

वीज सवलत घोटाळा प्रकरणी निवृत्त अभियंत्याच्या युक्तिवाद सुरू

आता या अर्जावर पुढील सुनावणी 18 जून रोजी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेसचे सरकार गोव्यात असताना घडलेला आणि तत्कालीन वीज मंत्री मॉवीन गुडीन्हो यांचा सहभाग असल्याने अत्यंत गाजलेला 5.50 कोटींच्या वीज सवलत घोटाळ्यात आपला कुठल्याही प्रकारचा सहभाग नसल्याचा दावा निवृत्त वीज अभियंते टी. नागराजन यांच्यावतीने आज न्यायालयात करण्यात आला.

(Retired engineer's argument continues in power concession scam case)

दक्षिण गोव्यातील खास न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्यासमोर ही सुनावणी चालू असून या खटल्यातून आपल्याला वगळावे अशी मागणी करणारा अर्ज सादर केला असून आज त्यावर युक्तिवाद झाला.

उद्योगांना वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय सरकारचा होता. आणि वीज खात्याचा कर्मचारी या नात्याने आपण त्याची कार्यवाही केली. त्यामुळे आपला या कथित घोटाळ्यात काहीही संबंध नाही असे नागराज यांनी आपल्या लेखी युक्तिवादात म्हटले आहे. आता या अर्जावर पुढील सुनावणी 18 जून रोजी होणार आहे.

काँग्रेस सरकारात वीज मंत्री असताना गुदिन्हो यांनी वीज अभियंत्यांना हाताशी धरून काही कंपन्यांना बेकायदेशीररित्या वीज बिलात सवलत देऊन राज्याच्या तिजोरीला 5.50 कोटींचा चुना लावला असा गुदिन्हो व इतरांवर आरोप असून एकूण सात जणांवर भ्रष्टाचार करणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कट कारस्थान रचणे असे आरोप ठेवले आहेत. मजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी हे प्रकरण धसास लावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: एफडीएच्या अचानक तपासणी मोहिमेत अनेक दुकाने बंद

SCROLL FOR NEXT