Luisin Folero Dainik Gomantak
गोवा

गोव्यात राजकीय हालचालींना पुन्हा वेग; फोलेरो कोलकात्याला रवाना

आज काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस (Agnel Fernandes) व भाजपचे ग्रामीण विकासमंत्री दिल्लीला गेले. त्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेस पक्षाचा (Congress) राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते लुईझिन फाेलेरो (Luisin Folero) आज दुपारी कोलकत्ता (Kolkata) येथे जाण्यास दाबोळी विमानतळावरून रवाना झाले. उद्या होणाऱ्या समारंभात ते रीतसर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मगोचे माजी आमदार लवू मामलेदार हेही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास रवाना झाले. आज काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस (Agnel Fernandes) व भाजपचे ग्रामीण विकासमंत्री दिल्लीला गेले. त्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचा राजीनामा देऊन मी सर्व काही उघड केले आहे. त्यामुळे लवकरच सर्व काही कळेल. ही सध्या चळवळ आहे.

काल झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचा राजीनामा देऊन मी सर्व काही उघड केले आहे. त्यामुळे लवकरच सर्व काही कळेल. ही सध्या चळवळ आहे. ही चळवळ आता सुरू झाली आहे व ती पुढे सुरू राहणार आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाचे नेतृत्व करणार का? असे विचारले असता ते म्हणाले, मी अजून काहीच ठरविलेले नाही. माझा लढा भाजपविरोधी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आणखी काही गोव्यातील नेते तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत का असे विचारले असता ते म्हणाले, त्याबाबत मला काही माहिती नाही.

माजी मुख्यमंत्री व माजी काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे माजी सरचिटणीस ॲड. यतीश नाईक, विजय पै, आनंद नाईक, मारिया पिंटो आदी नेते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी आमदार लवू मामलेदार हेसुद्धा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मडकईमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यापूर्वी त्यांनी दोनवेळा फोंडा मतदारसंघातून मगोच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. मात्र, पहिल्यांदा पराभूत झाल्यानंतर दुसऱ्यांदा मगो - भाजप युतीमुळे त्यांनी काँग्रेसचे नेते रवी नाईक यांचा पराभव केला होता.

दरम्यान, मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी आपल्या पत्नी डिलायला लोबो यांनाही आगामी निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ते स्वतः कळंगुटमधून, तर त्यांच्या पत्नी शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हल्लीच गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत लोबो यांना ठोस आश्‍वासन मिळालेले नसल्याने भाजपकडून दोघांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे लोबो यांच्या दिल्लीला जाण्यामुळे राज्यात चर्चा सुरू झाली आहे. ते या भेटीत भाजप की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT