Restricted Water Supply in South Goa Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांनो पाणी जपून वापरा, तीन दिवस पाईपलाईन दुरूस्तीचे काम; या भागाला बसणार फटका

सहाय्यक अभियंत्यांनी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसद्वारे माहिती

दैनिक गोमन्तक

Restricted Water Supply in South Goa : दक्षिण गोव्यात दुरुस्तीच्या कारणास्तव पुढील 3 दिवस पाणीपुरवठा प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती सहाय्यक अभियंत्यांनी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसद्वारे दिली आहे.

माहितीनुसार, साळावली येथील 160 दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम असल्यामुळे पाणीपुरवठा प्रतिबंधित करण्यात आला आहे.

शेळपे-सांगे येथे ही दुरुस्ती करण्यात येणार आहे. 25, 26 आणि 27 ऑगस्ट रोजी दक्षिण गोव्यात कमी पाण्याचा पुरवठा असणार आहे. या दिवसात केवळ 140 दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे.

मात्र, अन्य 100 दशलक्ष लीटर क्षमतेच्या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT