Som Yag Yadnya Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023 Goa: विश्वकल्याणाचा संकल्प: अग्निष्टोम् महासोम यागास प्रारंभ

सकारात्मक ऊर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी, मन:शांती तसेच आध्यात्मिक समाधानासाठी हा कार्यक्रम सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

गोमन्तक आणि सकाळ माध्यम समूहातर्फे विश्‍वकल्याणार्थ आयोजित ‘अग्निष्टोम महासोमयाग’ला आज रविवारपासून प्रारंभ झाला. सकारात्मक ऊर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी, मन:शांती तसेच आध्यात्मिक समाधानासाठी काणका-म्‍हापसा येथे हा कार्यक्रम सुरू आहे. हा याग 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पहिल्याच दिवशी गोमंतकीयांनी या दुर्मिळ अशा महासोमगायच्या मांगल्य तसेच प्रसन्नतेची अनुभूती घेतली.

विश्‍वाटी विश्‍वेश्‍वर देवस्थानच्या परिसरात या सोमगाय यज्ञाला प्रारंभ सकाळी 8 वाजता ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या हस्ते विश्वकल्याण, रोगमुक्त परिसर, सकारात्मक उर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी तसेच आध्यात्मिक समाधानासाठी संकल्प करून करण्यात आला.

त्यानंतर पवार यांच्याच हस्ते यज्ञस्थळी गणपतीपूजन, पुण्याहवाचन झाले. या विधीनंतर त्यांनी या अग्निष्टोम महासोमयागचे यजमानपद हे म्हापशाचे ग्रामपुरोहित सोमयाजी सुहोता दीपक दीक्षित आपटे व त्यांच्या पत्नी समृद्धी यांच्याकडे सोपविले. आपटे दाम्पत्य हे कार्य पुढे सहा दिवस मार्गास नेणार आहेत.

आजपासून प्रवर्ग विधी: 25 फुटी अग्निज्वाला

आज रूत्विज विश्वनाथ जोशी यांच्याकडून यजमान सोमयाजी सूहोता दीपक दीक्षित आपटे यांना विधिवत दीक्षा देण्यात आली. त्यानंतर अग्नी मंथन करून यज्ञास प्रारंभ झाला. त्यानंतर यजमानांची भिक्षा फेरी झाली. या विधीनंतर यजमान अग्निस्वरुप मानला जातो. सोमयागात उद्या, सोमवारपासून प्रवर्ग विधीस प्रारंभ होईल.

ज्यामध्ये 25 फुटी अग्निज्वाला निर्माण होतील. भाविकांसाठी दिवसभर यज्ञस्थळी दर्शन घेता येणार आहे. तसेच दुपारी महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. जास्तीतजास्त भाविकांनी या सोमयागाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन ‘गोमन्तक’तर्फे करण्यात आले आहे.

अग्निहोत्राने दूषित वातावरण दूर

यज्ञ हा वातावरण शुद्धीसाठी असतो. विश्‍वशांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते. ती यज्ञाने साध्य होते. अस्वच्छ वातावरणात रोगाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होते. अशावेळी अग्निहोत्राने दूषित वातावरणाला दूर सारता येते.

स्वच्छ व शुद्ध वातावरणाचा परिणाम रोगाणूंचा नाश करण्यास तर होतोच, पण मनःशांती प्राप्त करुन देण्यातही होते. अग्निहोत्राचे जे मंगल परिणाम विशेषतः वातारवणात होतात, त्यामुळे जीवजंतूंचे वाढ कमी झाल्याचे विज्ञानानेही म्हटले आहे. या अग्निहोत्राच्या उपासनेमुळे वातावरण शुद्ध होऊन एकप्रकारचे संरक्षककवच निर्माण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 WC 2026: टीम इंडियासाठी 'करो या मरो'! सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण? भारताचा हा 'मास्टर प्लॅन'; पाहा संपूर्ण रोडमॅप

Holi 2026 Horoscope: होळीला ग्रहांचं महामिलन! शुक्र-शनीची युती देणार छप्परफाड धनलाभ, रखडलेली कामं होणार पूर्ण; वैवाहिक जीवनातही नांदणार सुख

"मी शाहरुखसोबत काम केलं कारण...", अर्शद वारसीने 'किंग' सिनेमाबाबत केले मोठे वक्तव्य; आर्यनबाबत म्हणाला की ' तो तर........'

पत्रिका वाटल्या, पाहुणे जमले... लग्नाच्या दिवशीच दोन शिक्षिका बहिणींनी संपवलं जीवन, लग्नाचं घर झालं स्मशान; जोधपूरमधील धक्कादायक घटना

Borim Accident: दुर्दैवी घटना! विचित्र अपघातात बोरीतील तरुण ठार; गोव्यातील अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच

SCROLL FOR NEXT