Goa Border  Dainik Gomantak
गोवा

माजाळी नाक्‍यावर तणाव; दोन डोस घेऊनही रोखले

पोळे तपासणी नाक्यावर कर्नाटकातून गोव्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या रहिवाशांना प्रवेश न देण्यासाठी काहींनी विरोध दर्शविला.

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोणमधील (Canacona) रहिवाशांना वैद्यकीय कारणासाठी कारवारला जायचे होते. मात्र, कोरोनाचे दोन डोस (Vaccination) घेतल्याचा दाखला देऊनही त्यांना माजाळी तपासणी नाक्यावरून अडविण्यात आल्याने काणकोणमधील संतापलेल्या काही रहिवाशांनी पोळे तपासणी नाका कारवारवासीयांसाठी अडवून ठेवला.

आज काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो आणि नगरसेवक रमाकांत ‌‌‌‌‌‌‌‌नाईक गावकर हे कारवारला वैद्यकीय तपासणीसाठी जात होते. त्यांना माजाळी तपासणी नाक्यावर अडविण्यात आले. त्यानंतर पोळे तपासणी नाक्यावर कर्नाटकातून गोव्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या रहिवाशांना प्रवेश न देण्यासाठी काहींनी विरोध दर्शविला. कोरोनाचे दोन डोस घेऊनही कर्नाटकात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी कर्नाटक सरकारने आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केली आहे.

मात्र, पोळे तपासणी नाक्यावरून दोन डोस घेतल्याचा दाखला दिल्यास थेट प्रवेश दिला जातो. यावरून पोळे तपासणी नाक्यावर वादंग झाला. मात्र, संध्याकाळी उशिरा गोव्यातून कोणी वैद्यकीय कारणासाठी कर्नाटकात प्रवेश करत असल्यास त्यांना प्रवेश देण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माजाळी तपासणी नाक्यावर दिली. त्यामुळे या विषयावर पडदा पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT