Dabos Valpoi Road
वाळपई: वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग १ मधील दाबोस - वाळपई रस्त्याची अत्यंत दयनीय स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर विद्युतवाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे व अवजड वाहतुकीमुळे रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. त्यामुळे वाहनचालकांना हा रस्ता डोकेदुखी ठरत असून हा मार्ग अपघातास कारणीभूत ठरत आहे.
वाळपई भागात विकासकामांना गती देताना सहा महिन्यांपूर्वी दाबोस येथे भूमिगत वीजवाहिन्या घालण्यासाठी रस्त्याच्या बाजुला खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण गावातील रस्ता खोदलेला होता.
काही महिन्यांपूर्वी भूमिगत विद्युतवाहिनी घाण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्याच्या बाजुला खोदलेले खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत. दाबोस गावचा रस्ता जुना होता, पण सुस्थितीत होता.
मात्र, भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे एका बाजुने रस्त्यावर ताण येऊन तसेच दाबोस पाणी प्रकल्पाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या अवजड टॅंकरमुळे रस्ता पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. रात्री अपरात्री वाहतूक करणाऱ्यांना सध्या आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गावातील ग्रामस्थ गणेश धुरी म्हणाले, पूर्वी आमचा रस्ता चांगला होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी केलेले खोदकाम व पिण्याच्या पाण्याची ये जा करत असलेल्या टँकरमुळे रस्त्याची वाताहात झाली आहे. त्यामुळे अत्यंत धोकादायक स्थितीत वाहनचालकांना आपले वाहने हाकावी लागत आहेत. आम्ही ग्रामस्थांतर्फे अनेकवेळा रस्ता विभाग तसेच वीज खात्याला यासंबंधी तक्रारसुध्दा देण्यात आली आहे. मात्र, अद्याप याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. त्यामुळे जर लवकरात लवकर हा रस्ता सुरळीत केला नाही, तर आम्ही या रस्त्यावरील टँकर वाहतूक बंद करू.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.