Velsao Road Issue Dainik Gomantak
गोवा

Velsao: पारंपरिक रस्ता बंद केल्यामुळे वेळसावमध्ये तणाव, 'रेल्वे ट्रॅक' कामासाठी वाटेत ढिगारा, गोवा नष्ट करण्याचा हेतू असल्याचा दावा

Velsao Railway Track Doubling: वेळसांव येथे रेलमार्ग दुपदरीकरणाचे काम करताना रेल्वे विकास निगमने मातीचा ढिगारा उभारून पारंपरिक रस्ता बंद केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

Sameer Panditrao

Velsao Railway Track Doubling Road Issue

वास्को: वेळसांव येथे रेलमार्ग दुपदरीकरणाचे काम करताना रेल्वे विकास निगमने मातीचा ढिगारा उभारून पारंपरिक रस्ता बंद केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, रहिवाशांचा विरोध पाहून तेथील ट्रक व इतर यंत्रणा हलवण्यात आली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जमीन खासगी असून येथे भूसंपादन झाले नाही. तरीही रेल्वे काम पुढे रेटत आहे. या जमिनीसंबंधी रेल्वेच्या अर्जावर इन्स्पेक्टर ऑफ सर्व्हे व लँड रेकॉर्ड्स सुनावणी घेत आहेत. पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे रेल्वे विकास निगमने तेथे सुरू केलेले काम बेकायदा असल्याचा दावा स्थानकांनी केला आहे.

रेलमार्ग दुपदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. तथापि, वेळसांव येथे अद्याप रेलमार्ग दुपदरीकरणाला मोठा विरोध होत आहे. रेलमार्ग दुपदरीकरणामुळे खासगी जमिनीवर अतिक्रमण करण्यात येत आहे, शिवाय रेलमार्ग तेथील घरांच्या कुंपणापर्यंत घालण्यात येणार असल्याने पारंपरिक वाट बंद होण्याची भीती रहिवासी व्यक्त करीत आहेत.

आता रेल्वे विकास निगमने काम सुरु करताना तेथे ट्रकांतून माती आणून पारंपरिक रस्त्यावरच टाकली आहे. त्यामुळे रस्ता बंद झाला आहे. घरातील वाहने बाहेर कशी काढावी असा प्रश्‍न त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला विचारला.

मात्र तो समर्पक उत्तर देऊ शकला नाही. याविषयी माहिती मिळताच माजी मंत्री एलिना साल्ढाणा, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियतो फर्नांडिस, गोंयचो एकवोटचे संस्थापक सदस्य ऑर्विल दोदादो, सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी, अँथोनी हे घटनास्थळी पोचले. त्यांनी रेल्वे विकास निगमच्या एकंदर भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला.

गोवा नष्ट करण्याचा हेतू : साल्ढाणा

कोळसा कॉरिडॉर बांधण्यासाठी राष्ट्रीय नकाशावरून गोवा नष्ट करण्याचा हेतू असल्याचा दावा साल्ढाणा यांनी केला. सध्या असलेल्या रेलमार्गसाठी येथील रहिवाशांनी आपली जमीन दान केली होती. त्या जमिनीचे भूसंपादन झाले नव्हते. ती जागा अद्याप रेल्वेच्या मालकीची नाही. आताही कोणतीही प्रक्रिया न करता रेल्वे आपले काम पुढे नेत आहे. ही जमीन खासगी आहे. त्यावर रेल्वे अतिक्रमण करीत असल्याचा दावा त्यांनी केला. रेल्वेने मोठ्या प्रमाणात तेथे माती टाकल्याने रहिवाशांनी कोठून जावे, वाहने कशी बाहेर काढावीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

१. साल्ढाणा यांनी तेथे उपस्थित असलेले रेल्वे विकास निगमचे उपव्यवस्थापक हर्षा यांना या जमिनीच्या मालकीसंबंधीचे कागदपत्र दाखविण्याची मागणी केली. मात्र ते कोणतेही कागदपत्र दाखवू शकले नाही. रेल्वे विकास निगम दादागिरी दाखवून तेथे खासगी जमीन बळकावून रेलमार्ग दुपदरीकरण करू शकत नसल्याचे साल्ढाणा यांनी स्पष्ट केले.

२. दोरादो यांनी त्या अधिकाऱ्याला एकंदर परिस्थिती समजावून सांगितली. रेल्वेकडे त्या जमिनीसंबंधी कोणतीही कागदपत्रे नसतानाही हे काम पुढे नेत असल्याचे ते म्हणाले. त्या जमिनीच्या एकंदर वादासंबंधी दक्षिण पश्र्चिम रेल्वेने इन्स्पेक्टर ऑफ सर्व्हे व लँड रेकॉर्डस्कडे अर्ज दाखल केला आहे. त्यासंबंधी सुनावणी सुरू असतानाही रेल्वे हे काम पुढे रेटत असल्याचे ते म्हणाले. पोळजी यांनीही रेल्वे अधिकारी बेकायदा हे काम करीत आहे. सरकारने यात लक्ष घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT