Tilari Project residential blocks Dainik Gomantak
गोवा

तिळारीतील निवासी गाळे बनलेत भूत बंगले, तळीरामांची चंगळ

करोडो रुपये खर्च केलेले हे गाळे वापराविना पडून आहेत.

दैनिक गोमन्तक

धारगळ पंचायत क्षेत्रातील दोन खांब परिसरात जलसिंचन खात्याचे तिळारी प्रकल्पातील निवासी गाळे सध्या भूत बंगले बनले असून करोडो रुपये खर्च केलेले हे गाळे वापराविना पडून आहेत.

सरकारने दोन खांब येथे हजारो चौरस मीटर जागा संपादित करून त्या ठिकाणी तिळारी जलसिंचन खात्यातर्फे निवासी गाळे उभारले होते. त्यातील काही गाळ्यांचा वापर केला जातो, तर काही गाळे वापराविना पडून आहेत. दुर्लक्ष झाल्यामुळे ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. रात्रीच्या वेळी काही मद्यपी त्यांचा गैरवापर करतात, असे आढळून आले आहे. (Tilari Project residential blocks)

मोपा विमानतळ ते धारगळ-सुकेकुळणपर्यंत लिंक रोड होत असल्यामुळे धारगळ पंचायत क्षेत्राला भविष्यात मोठा लाभ होऊ शकतो.

त्या दृष्टीकोनातून धारगळ पंचायतीने पुढाकार घेऊन तिळारी प्रकल्पाचे गाळे वापराविना पडून आहेत, त्यातील काही जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी बहुउद्देशीय प्रकल्प उभारावा, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs England: इंग्रजांचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाचं फायनलचं तिकीट कन्फर्म; आता किवींसोबत होणार महामुकाबला!

Goa Crime: केळशी हादरली! विहिरीत आढळला ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह; गळ्यात आढळली दोरी, संशयाची सुई खुनाच्या दिशेने?

Meta Smart Glasses: "सावधान! तुमचे खाजगी क्षण कोणीतरी पाहतंय!" मेटा चष्म्यांनी टिपलेले व्हिडिओ होतायत लीक; केनियातील डेटा वर्कर्सचा धक्कादायक खुलासा

Morgan Stanley Layoffs: "70 अब्ज डॉलर्सचा नफा, तरीही नोकरीवर गदा!" मॉर्गन स्टॅनलीनं 2500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; 'हे' कारण ठरलं नोकरी जाण्याचं

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT