NEET Exam Dainik Gomantak
गोवा

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

NEET Exam: ‘एनएसयूआय’ ः पेपरफुटीतून घडणाऱ्या डॉक्टरांमुळे आरोग्यसेवा धोक्यात

गोमन्तक डिजिटल टीम

‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरातील २५ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. अनेकांना अटकही करण्यात आली. या परीक्षेत जे विद्यार्थी पेपरफुटीमुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, ते जेव्हा डॉक्टर होतील त्यावेळी त्यांच्या पात्रतेवर शंका घेण्यात येईल. त्यामुळे ‘नीट’ परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय सचिव अरहज मुल्ला यांनी केली.

पणजी येथील कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी एनएसयूआय गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी उपस्थित होते. दरम्यान अरहज मुल्ला म्हणाले, जर पेपर फुटीमुळे डॉक्टर होणारे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करतील, त्यावेळी देशाची आरोग्य सेवा धोक्यात येईल.

त्यामुळे ‘नीट’ परीक्षा पुन्हा होणे गरजेचे आहे. ज्यांनी रात्रंदिवस एक करून अभ्यास केला आहे, ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांना प्रवेश मिळणे अपेक्षित आहे. त्यासोबतच नॅशनल टेस्टींग एजन्सीवर बंदी घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी!

डॉक्टर आमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. ‘कोविड’मध्ये आम्हाला गुणवत्तापूर्ण डॉक्टरांची कमतरता भासली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करावी.

गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यांच्यावर अन्याय होत आहे. केंद्राने ‘एटीए’द्वारे आयोजित ‘नेट’ परीक्षा रद्द करत नव्याने घेण्याचे ठरविले आहे, तसे ‘नीट’ परीक्षेच्या बाबतीत का होत नाही, असा प्रश्‍न नौशाद चौधरी यांनी उपस्थित केला.

..तर उपचारांवर साशंकता!

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एकूण १८० जागा डॉक्टरांसाठी आहेत, त्यातील २७ जागा या उर्वरित भारतीयांसाठीच्या कोट्यात राखीव असून जर पेपरफुटीमुळे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी गोव्यात शिकण्यासाठी आले, तर ते येथील रूग्णांना तपासतील त्यावेळी येथील रूग्णांना धोका निर्माण होईल. त्यांच्या उपचारांवर साशंकता असेल, असेही मुल्ला यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT