Janardan Bhandari
Janardan Bhandari Dainik Gomantak
गोवा

Janardan Bhandari: मडगाव ते कारवार कदंब बस सात दिवसात पूर्वीच्‍या मार्गाने सोडा, अन्यथा...

सुशांत कुंकळयेकर

Janardan Bhandari Demand KTCL President

मडगाव ते कारवार ही बस मध्‍ये काणकाेणमध्‍ये थांबविण्‍यात यावी अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस नेते जना भंडारी यांनी केली असून आज त्‍यांनी कदंब महामंडळाचे अध्‍यक्ष उल्‍हास तुयेकर यांची भेट घेऊन त्‍यांना निवेदन दिले. सात दिवसात ही बस पूर्वीप्रमाणे चालू केली नाही तर रस्‍त्‍यावर येऊन आंदोलन करण्‍याचा इशाराही त्‍यांनी दिला आहे.

नेहमी सकाळी ६.३० वा. मडगावहून सुटणारी कंदब महामंडळाची बस तडकाफडकी मडगाव ते कारवार (जलद ) करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे शिक्षक, विद्यार्थी व अन्य नागरिकांचे हाल होत आहेत.

या त्रस्त प्रवाशांनी कदंब महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पूर्वीप्रमाणेच ती मडगावहून सोडण्याची आग्रहाची मागणी केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे, की सकाळी ६.३० वा. मडगावहून सुटणार्‍या बसमुळे नावेली, चिंचोणे क्रॉस, दांडेवाडी, भाटपाल, श्रीस्थळ, पैंगीण आदी बस थांब्यावर शिक्षक, विद्यार्थी व अन्य नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाणे सोयीचे होत असे.

मात्र आता या बसचा रुट अचानक ‘जलद’ करण्यात आला असल्यामुळे विशेष करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे जास्त हाल होत आहेत. कारण वरील काही थांब्यावर उतरून काहीना दुर्गम भागात कामाच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचणे शक्य होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Goa Today's Live News: सांताक्रुज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप सावंत

Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

Margao Corporation Building : मडगाव पालिका इमारत दुरुस्ती करा;पोर्तुगीजकालीन प्रशासकीय इमारत जीर्ण

Death Due To Fasting: निर्जळी उपवास बेतला जीवावर, फोंड्यात बिहारच्या युवतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT