Goa Tableau 2024 Dainik Gomantak
गोवा

Republic Day 2024: दिल्लीच्या कर्तव्यपथावर दिसणार गोव्याचा चित्ररथ; प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात संधी मिळाली

Republic Day Parade: यंदाच्या वर्षी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनामध्ये १५ राज्यांचा समावेश असून यामध्ये आपल्या गोव्याला देखील स्थान मिळालंय

Akshata Chhatre

Republic Day Parade Goa Tableau 2024

दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या संचलनाची मोठी चर्चा केली जाते. गेल्यावर्षी या निमित्ताने कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनामध्ये गोव्याला संधी मिळाली नव्हती, पण आता मात्र २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात गोव्याला संधी मिळाली आहे. यंदाच्या वर्षी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनामध्ये १५ राज्यांचा समावेश असून यामध्ये आपल्या गोव्याला देखील स्थान मिळालंय.

कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनामध्ये गोव्यासोबत सामील होणाऱ्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या राज्यांचा समावेश झालाय.

तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि तेलंगणा यांना यादीत स्थान मिळालेलं नाही.

प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या या संचलनात आपल्या राज्याला स्थान मिळावं अशी अनेकांची इच्छा असते आणि यावरून वाद देखील होतात. हे वाद लक्षात घेऊन किमान तीन वर्षांमधून एकदा संधी मिळावी म्हणून संरक्षण मंत्रालयाने नवीन नियम जारी केला आहे. शिवाय या निमित्ताने बसलेल्या निवड समितीला हा चित्ररथ पटणं ही अट देखील प्रमुख अटींमध्ये सामील करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT