गोमन्तक डिजिटल टीम
भारत यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.
यंदा हा प्रजासत्ताक दिन आठवडाभर साजरा करण्याचे नियोजन भारत सरकारने केले आहे.
२३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून याची सुरूवात करण्यात आली आहे.
यंदाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावरील परेड ही महिलांवर केंद्रित असणार आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम ही ‘विकसित भारत आणि भारत-लोकतंत्राची मातृका’ अशी असणार आहे.
यंदाच्या परेडची सुरूवात ही १०० महिला कलाकारांतर्फे करण्यात येणार असून या महिला ढोल, शंख, नगाडे आणि इतर पारंपारिक वाद्ये वाजवणार आहेत.
ज्यामध्ये देशातील विविध राज्यांतील सुमारे १५०० महिला त्यांच्या पारंपारिक पोशाखामध्ये नृत्याविष्कार सादर करतील.
यंदाचा प्रजासत्ताक दिन हा महिला सक्षमीकरणावर आधारित आहे. या वर्षी पहिल्यांदाच कर्तव्य पथावर भारतीय लष्कराची आर्टिलरी महिला ऑफिसर देखील नेतृत्व करताना दिसणार आहे.