Goa Firing Dainik Gomantak
गोवा

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

Goa Firing Incident: सत्तरी तालुक्यातील पडोसे गावात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Manish Jadhav

सत्तरी: सत्तरी तालुक्यातील पडोसे गावात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याच ठिकाणी गेल्या महिन्यात गोळीबाराची एक घटना ताजी असताना गुरुवारी रात्री (27 नोव्हेंबर) पुन्हा त्याच ठिकाणी गोळीबार झाला. या घटनेमुळे पडोसे गावातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गेल्या महिन्यात पडोसे येथे झालेल्या पहिल्या घटनेत एका मजुराला गोळी लागून तो जखमी झाला होता. या घटनेचा तपास सुरु असतानाच गुरुवारी रात्री त्याच परिसरात पुन्हा गोळीबार झाल्याची माहिती वाळपई पोलिसांना मिळाली.

वाळपई पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कसून तपासणी सुरु केली. पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून घटनास्थळावरुन काही आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या. जप्त केलेले साहित्यामध्ये एअरगन आणि एअरगनची काडतुसे आहेत.

एअरगन ही सामान्य बंदुकीपेक्षा वेगळी असली तरी, ती ही मोठ्याप्रमाणात इजा पोहोचवू शकते. पोलिसांनी यापूर्वीच्या गोळीबाराच्या घटनेशी या दुसऱ्या घटनेचा काही संबंध आहे का, या दिशेने तपास सुरु केला आहे. दुसऱ्यांदा गोळीबार झाल्यामुळे पडोसे गावातील लोक भयभीत झाले आहेत. पोलीस सध्या या घटनेमागील नेमका उद्देश आणि ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सहभाग यासंबंधी अधिक तपास करत आहेत. सत्तारीसारख्या (Sattari) ग्रामीण भागात अशा प्रकारे वारंवार गोळीबाराच्या घटना घडणे हे गंभीर आव्हान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT